बाळ बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी

बाळ बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी 

वेब टीम नगर : रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला शहरातील एका विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . बोठे याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. 

कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी वर्ग करण्यात आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली होती या प्रकरणी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी तपासी अधिकारी पोलीस निरिक्षजक राकेश मानगावकर यांनी केली होती मात्र न्यायालयाने बोठेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.   Post a Comment

0 Comments