आवाज उठविल्याने माझ्या जीविताला धोका : शांताबाई राठोड

 आवाज उठविल्याने माझ्या जीविताला धोका : शांताबाई राठोड 

वेब टीम पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्य घटनेला आज १९ दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करायला गेलेल्या पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या परिवारावर गंभीर आरोप केले आहेत. पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे.

माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा असं आवाहन शांताबाई राठोड यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केलं आहे. माझ्यावर तक्रार दाखल झाली हे चुकीचे आहे. मी सत्यासाठी लढा देत आहे. मी पुण्यात जाऊन तक्रार दिली म्हणून झळ लागली. स्वतःच्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी गेला नाहीत. तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात, असं शांताबाई राठोड यांनी म्हटलं आहे.

शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले असल्याचा देखील आरोप केला होता. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली होती.

Post a Comment

0 Comments