महानगरपालिका कोरोना दक्षता पथकाच्या वतीने ११४ नागरिकांवर ५२४०० रुपयांची दंडात्मक कारवाई

 महानगरपालिका कोरोना दक्षता पथकाच्या वतीने  ११४ नागरिकांवर ५२४०० रुपयांची दंडात्मक कारवाई

वेब टीम नगर :  शहरात कोरोनाचा उद्रेक वाढला तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ,नागरीकांकडून कोरोना नियमांचे प्रभावी पालन व्हावे,सोशल डिस्टन्स,सॅनिटायजर आणि मास्कचा वापर व्हावा, गर्दी नियंत्रणात यावी यासाठी अहमदनगर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या अधिपत्याखाली चार कोरोना दक्षता पथकांची नियुक्ती केली असुन चार दिवसात या पथकांच्या वतीने ११४ नागरिकांवर सोशल डिस्टन्स नसणे,मास्कचा वापर न करणे, गर्दी करणे अंतर्गत  ५२४०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली. पथक प्रमुख परिमल निकम,संतोष लांडगे,कल्याण बल्लाळ,शशिकांत नजान यांच्या पाथकाने शहरातील कापड बाजार,प्रोफेसर चौक,भिस्तबाग चौक,पाईपलाईन  रोड,प्रोफेसर चौक , चितळे रोड,दाळमंडई,माळीवडा,टिळक रोड,वाडिया पार्क,जुना बाजार, झेंडीगेट,केडगाव,नवीपेठ,दिल्लीगेट, बोल्हेगाव,सावेडी, टिळक रोड,बलिकाश्रम रोड,भूतकरवाडी, सर्जेपुरा,गंजबाजार,बुरुडगाव रोड,भाजीमार्केट मार्केट यार्ड,रेल्वे स्टेशन,एसटी स्टँड परिसर यासह विविध ठिकाणी दुकान,खाद्य पदार्थ स्टॉल,हॉटेल,मंगल कार्यालय, गर्दीचे ठिकाणी कोरोना नियमावली संदर्भात सूचना दिल्या तसेच नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.

     खाद्यपदार्थ स्टॉल मालक यांना सोशल डिस्टन्स,दोन स्टॉल मध्ये अंतर बाबत दक्षता पथक प्रमुख श्री.परिमल निकम यांनी सूचना दिल्या

     फळ व भाजीपाला मार्केट येथील व्यापारी,मार्केट कमिटी निरीक्षक, यांच्या समवेत   मीटिंग घेऊन दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान यांनी व्यापारी,आडते, शेतकरी,आणि ग्राहक यांना सोशल डिस्टन्स,मास्क आणि सॅनिटायजर चा वापर या बाबत सूचना दिल्या तसेच मार्केट कमिटीच्या वतीने गर्दीचे नियोजन, In आणि Out प्रवेशद्वार येथे वाहनांचे नियोजन या बाबत चर्चा करून प्रभावी अंमलबजावणी करावी असे सांगितले. नियम तोडणाऱ्यांवर  दंडात्मक कारवाई तसेच दुकान सील करण्यात येतील असे सांगितले. भाजीपाला मार्केट येथे विना मास्क दंड केल्यानंतर या पथकाने मास्क वाटप देखील केले.

   प्रभाग क्र ४ मधील मंगलकार्यालय, हॉटेल चालक यांना करोना सम्बन्धित निर्देशाचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या  तसेच मंगल कार्यालय संचालक यांचेशी करोना प्रादुर्भाव  बाबत निर्देश पाळण्याबाबत पथक प्रमुख संतोष लांडगे , कल्याण बल्लाळ यांनी चर्चा केली

  शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये चार पथकातील सहायक  के. पी. जाधव , विजय बोधे, सूर्यभान देवघडे,नंदकिशोर नेमाने  अमोल लहारे , राहुल साबळे , भास्कर आकुबत्तीन यांचा सहभाग होता.

     कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी कोरोना नियमावलीचे प्रभावीपणे पालन करून आपले आणि आपल्या परिवाराचे रक्षण करावे, अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शंकर गोरे आणि उपायुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments