योगसाधना : वीरासन -१
वीरासन -१
वीर म्हणजे योद्धा किंवा विजेता. गुढगे एकत्र जुळवून पाय पसरून ते कमरे जवळ टेकून बसून करण्याचे हे असं ध्यान आणि प्राणायाम यासाठी उपयुक्त आहे.
पद्धती : १) जमिनीवर गुडघे टेकवा गुडघे एकत्र जुळवून ठेवा आणि पावलं मध्ये १८ इंच अंतर ठेवून पाय पसरा.पार्श्वभाग जमिनीवर टेकवा परंतु शरीर पावलांवर ठेवू नका पावले मांड्यांच्या शेजारी ठेवा पोटरीची आतली बाजू ही त्या बाजूच्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला चिकटेल अशा तऱ्हेने बसा.
२)बोटे मागे रोखलेली आणि जमिनीला स्पर्श करणारी असू द्यात मनगटे गुडघ्यांवर ठेवा तर हात वर वळलेले असू द्या . अंगठा व पहिले बोट एकत्र जुळवा इतर बोटे उघडी उघडलेली असू द्या पाठ सरळ व ताठ ठेवा .
३) दीर्घ श्वसन करत शक्य तितका अधिक काळ याया स्थितीत रहा.मग तळहात काही काळ गुडघ्यावर विसरू द्या.आता बोटे एकमेकांमध्ये गुंफा आणि सरळ डोक्यावर ताणा तळहात वरच्या दिशेला असू द्या.
४) दीर्घ श्वसन करत या स्थितीत एक मिनिट राहा.श्वास सोडा बोटे मोकळी करा तळहात चवड्यावर ठेवा पुढे वाका आणि हनुवटी गुडघ्यांवर ठेवा. नेहमीप्रमाणे श्वसन करत या स्थितीत एक मिनिट राहा. श्वास घ्या धड वर उचला पावले पुढे आणा आणि विसावा घ्या.
५) हे आसन वर वर्णिल्याप्रमाणे करणे कठीण वाटले तर एका पावलावर दुसरे पाऊल ठेवून आणि त्यावर पार्श्वभाग टेकून हे आसन करा हळूहळू पायाची बोटे एकमेकांपासून दूर हलवा पावलं मधील अंतर वाढवा आणि मांड्या बाहेरच्या बाजूला असलेल्या राहू द्या. मग हळूहळू पार्श्वभाग योग्य तऱ्हेने जमिनीवर लागतील आणि शरीराचा भार पावलांवर पडेनासा होईल .
परिणाम : संधीवातामुळे गुडघ्यात येणाऱ्या कळा या आसनामुळे बऱ्या होतात तळपाया मधील सपाटपणा नाहीसा होतो आणि पावले याना या आसनात ताण बसतो त्यामुळे तेथे योग्य तऱ्हेची कमान निर्माण होते . अर्थात याला बराच काळ लागतो आणि कित्येक महिने दररोज काही मिनिटे हे आसन करावे लागते टाचे मध्ये वेदना होत असतील तर किंवा टाचे मधील हाड वाढले असेल तर ते बरे होते. जेवण किंवा खाणे झाल्यावर लगेच सुद्धा हे असं करता येते आणि त्यामुळे जड झालेले पोट हलके होते.
0 Comments