योगसाधना : पर्यंकासन

 योगसाधना  : पर्यंकासन 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पर्यंक  म्हणजे पलंग कोच किंवा सोफा हे आसन म्हणजे सुप्त वीरासना च्या पुढचा टप्पा आहे. या आसनामध्ये शरीर पलंगा सारखे दिसते म्हणून हे नाव पडले आहे. 

 पद्धती :

 १) वीरासनामध्ये बसा श्वास सोडा पाठ मागे झुकवा मान आणि छातीवर उचला आणि पाठीशी कमान करत फक्त टाळू जमिनीवर टेका धडाचा कोणताही भाग जमिनीवर असता कामा नये.  

२) हात कोपराशी  वाकवा उजव्या हाताने डावा दंड कोपरा जवळ  पकडा ,डाव्या हाताने उजवा  दंड कोपरा जवळ पकडा.  अशा तऱ्हेने बांधलेले हात डोक्याच्या मागच्या बाजूस जमिनीवर टेकवा.  

३) समकाल श्वसन  करत या स्थितीत एक मिनिट रहा.श्वास आत घ्या धड आणि मान जमिनीवर विसावू द्या.हात मोकळे करा पुन्हा वीरासनामध्ये बसा. आधी एक पाय आणि नंतर दुसरा पाय पुढच्या बाजूस ताठ करा जमिनीवर पालथे झोपा आणि विसावा घ्या. 

परिणाम : मत्स्यासन आणि पर्यंकासन  यामध्ये पाठीचा छाती मागचा विभाग पूर्णपणे ताणला जातो.  त्यामुळे फुफ्फुसे  पूर्णपणे फुगवली जातात मानेचे स्नायू ताणले जातात आणि कंठस्थ आणि उपकंठस्थ  ग्रंथी उत्तेजित होतात.  त्यामुळे त्यांचे कार्य योग्य रीतीने चालू राहते ज्यांना मत्स्यासन करणे जमत नाही अशा व्यक्तींना अशाच तऱ्हेचा  लाभ ह्या आसना मुळे होतो. 

 वीरासन आणि सुप्त वीरासन ही कोणत्याही वेळी जेवण झाल्यानंतर करता येतात पण पर्यंकासन मात्र जेवण झाल्यावर ताबडतोब करू नये. 



Post a Comment

0 Comments