योगसाधना : सिद्धासन

 योगसाधना : सिद्धासन 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सिद्धासन 

सिद्ध म्हणजे पवित्र आणि पुण्यवान अशी जवळजवळ दैवी  व्यक्ती . या व्यक्तीला अलौकिक सिद्धी प्राप्त झालेल्या असतात.  सिद्ध या शब्दाचा अर्थ साधू ऋ षी किंवा द्रष्टा असाही होतो.

  सिद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे सर्वात महत्वाचा नियम अहिंसा हा आहे.  आणि यमांमध्ये सर्वात महत्त्वाचा मिताहार हा आहे.  त्याप्रमाणे आसनांमध्ये सर्वात महत्त्वाचे असं हे सिद्धासन आहे. ८४ लक्ष आसनांमधून मनुष्याने सिद्धासनाचा नियमित अभ्यास करावा.  त्यामुळे ७२ हजार  नाड्या शुद्ध होतात . मानवी शरीरामध्ये मज्जाशक्ती  वाहक ज्या  शिरा असतात त्यांना नाड्या असे म्हणतात . आत्माचे ध्यान करणाऱ्या आणि मिताहार घेणाऱ्या योग्याने जर बारा वर्षे सिद्धासनाचा अभ्यास केला तर त्याला योगसिद्धी प्राप्त होतात.  आत्मा म्हणजे  जीवात्मा आणि परमात्मा ,सिद्धी म्हणजे अलौकिक सामर्थ्य . सिद्धासनावर प्रभुत्व मिळाले म्हणजे आनंददायी उन्मनी अवस्था स्वाभाविकपणे आणि प्रयत्नाविना प्राप्त होते .  

पद्धती : 

1) पाय  सरळ समोर पसरून बसा. डावा पाय गुडघ्यात वाकवा. डावे पाऊल हाताने धरा त्याची टाच शिवणी  नजीक ठेवा.  डाव्या पायाचा चवडा उजव्या मांडीला लावून ठेवा उजवा पाय ठेवा.  

2)पाय गुडघ्यात वाकवा आणि उजवे  पाउल  घोठ्यावर  ठेवा.  उजवी टाच  जगनास्थीला लावून ठेवा.मांडी आणि डाव्या पायाची पोटरी यामध्ये उजव्या पायाचा चवडा  ठेवा . 

3) शरीराचा भार टाचांवर ठेवू नका. हात पुढल्या बाजूला ताणा आणि तळहात वरच्या  दिशेला होतील अशा बेताने हाताची मागची बाजू गुडघ्यांवर ठेवा.अंगठा आणि पहिले बोट एकत्र जुळवा बाकीची बोटे पसरलेली राहू द्या.  

4) पाठ,मान ,डोके सरळ ठेवून नजर  नाकाच्या शेंड्यावर खिळवून ठेवावी. त्याप्रमाणे नजर आत वाळवून    या स्थितीत शक्य तितका वेळ अधिक रहा.पावले मोकळी करा आणि काही काळ विसावा घ्या.आता उजवी टाच प्रथम शिवणीशी  आणि नंतर डावे पाउल  उजव्या घोट्यावर असे करून वर वर्णिलेले आसन  आधीच्या आसन्न  इतकाच वेळ करा. 

 परिणाम : 

या आसनामुळे जघनाचा भाग निकोप राहतो.पद्मासना प्रमाणे  हे शरीर मनाला फार मोठ्या प्रमाणावर विश्रांती देणारे हे आसन आहे. बसलेल्या अवस्थेत असल्यामुळे या आसनात शरीर स्वस्थ असते.पायाची घातलेली मांडी आणि राहिलेली ताठ मान  यामुळे मन एकाग्र आणि तल्लख राहते.  प्राणायाम आणि समाधी यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे आसन  फार उपयोगी पडते केवळ शारीरिक दृष्टिकोनातून पाहिले तर गुडघे आणि घोटे यांचा ताठरपणा  नाहीसा होतो. पाठीचा तळचा भाग आणि पोट   यामध्ये रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे पाठीच्या कण्याचा खालचा भाग व पोटातील  अवयव सदृढ बनतात. 

Post a Comment

0 Comments