योगसाधना : गोमुखासन

 योगसाधना 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गोमुखासन 

गो म्हणजे गाय आणि मुख  म्हणजे चेहरा, एका टोकाला रुंद अशा एका वाद्यालाही  गोमुख असे म्हणतात. 

 पद्धती : 

१) पाय सरळ समोर पसरून जमिनीवर बसा.तळहात जमिनीवर टेकवा आणि पार्श्वभाग वर उचला. 

२) डावा गुडघा  मागच्या बाजूस वाकवा आणि डाव्या पावलावर बसा हात जमिनीवरून वर उचला, उजवा पाय वर उचला आणि उजवी मांडी डाव्या मांडीवर ठेवा, कंबर उचला आणि हाताच्या  मदतीने  घोटे व टाचांचे मागचे भाग एकमेकांना स्पर्श  करतील अशा तऱ्हेने एकत्र आणा. 

३) बोटे जमिनीवर टेकवा पायाची बोटे मागे रोखलेली असू द्या.डावा  हात डोक्याच्या वर उचला.तो कोपराशी वाकवा आणि डावा तळहात मानेच्या खाली खांद्याच्या मध्ये टेकवा.उजवा हात खालीं न्या.कोपराशी वाकवा आणि कोपरा पुढील हात मागील बाजूने वर न्या.उजवा खांद्याच्या पात्यांच्या पातळीला आणि त्यांच्या मध्ये आला पाहिजे . पाठीमागच्या बाजूला दोन खांद्यांच्या मध्ये दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफा. 

४) नेहमीसारखे श्वसन करत स्थितीत 30 ते 60 सेकंद रहा मान आणि डोके सरळ उभे ठेवा आणि नजर समोर राहू द्या.हात मोकळे करा डावा आणि उजवा या शब्दाची उलटापालट करून हे उलट बाजूने आसन  करा.  तर पाठीमागचे हात मोकळे करा पाय सरळ करा आणि विसावा घ्या. 

 परिणाम : या आसनामुळे पायातले पेटके बरे होतात पायाच्या  स्नायूंना लवचिकपणा येतो या आसनात  छाती चांगली फुगविली जाते आणि पाठ सरळ व ताठ बनते.  खांद्याचे सांधे अनिर्बंधपणे हालचाल करू लागतात आणि कमरेच्या मागचे स्नायू पूर्णपणे ताणले जातात. 

Post a Comment

0 Comments