अन्न औषध प्रशासनाची २ दूध संकलन केंद्रांवर कारवाई

 अन्न औषध प्रशासनाची २ दूध संकलन केंद्रांवर कारवाई 


वेब टीम नगर : अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे दिलीप रघुनाथ म्हसे ( व्हेटर्नरी डॉक्टर ) यांच्या मे. गोरक्षनाथ दूध संकलन केंद्र व रमेश पाटीलबा म्हसे यांच्या मे. म्हसे पाटील दूध संकलन केंद्र दोन्ही शिवेगाव पोस्ट कोदवड ता. राहुरी येथे सकाळी साडेसात वाजता छापा टाकून कारवाई केली . 

याठिकाणी दूध भेसळीसाठी साठवलेली व्हे. पावडर, ४० लिटर व्हे पावडर द्रावण व ३०० लिटर गाय  दूध असा एकूण २४,९३१ रु किमतीचा साथ जप्त केला. रमेश पाटीलबा म्हसे यांच्या संकलन केंद्रावर १५ किलो व्हे पावडर व ३०० लिटर भेसळयुक्त गाय  दूध असा  ११,७०० रु किमतीचा साथ जप्त केला या भेसळ युक्त दुधाचे  , व्हे पावडर , व्हे पावडर द्रावण याचे नमुने विश्लेषणाची घेतले असून भेसळ युक्त दूध जागेवर नष्ट करण्यात आले. दोन्ही दूध केंद्रांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

वरील दोन्ही व्यावसायिक दररोज ७०० - ७५० लिटर दूध शेतकऱ्यांकडून संकलित करून त्यामधगये व्हे पावडरचे तयार केलेले २५० -३०० लिटर दूध असे मिश्रण करून १००० लिटर दूध विक्री करीत असतात. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, शरद पवार, सहाय्यक प्रसाद कसबेकर यांनी सहाय्यक एस.पी.शिंदे यांच्या उपस्थितीत पार पाडली.            

Post a Comment

0 Comments