योगसाधना : भुजंगासन-१

 योगसाधना 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भुजंगासन-१  

भुजंग म्हणजे सर्प हे आसन  करताना तोंड जमिनीकडे ठेवून उपडे झोपा धडापासून वरचे शरीर वर उचला आणि दंश  करू पाहणाऱ्या सर्पाच्या फण्याप्रमाणे डोके मागे झुकवा.  

 पद्धती :

1) तोंड जमिनीकडे वळवून जमिनीवर पडा.  पाय लांब करा हे एकमेकांशी जुळलेले असू द्या.  गुडघे  आवळलेले आणि बोटे मागच्या दिशेला रोखलेली असू द्या. 

 2) तळहात ओटीपोटा नजीक जमिनीवर टेकवा. श्वास घ्या. तळहात जमिनीवर घट्ट दाबा आणि धड वर उचला दोनदा श्वसन करा . 

3) श्वास घ्या धडापासून वरील सर्व शरीर अशा तऱ्हेने उचला की जघनास्ती  जमिनीला लागून राहतील.  पाय आणि तळहात यावर भार देऊन या स्थितीला रहा.  

4) गुदद्वार ,कमरेचे  स्नायू आकुंचित करा आणि मांड्या आवळुन धरा. या स्थितीत  नेहमीप्रमाणे श्वसन करत सुमारे वीस सेकंद रहा.  

5) श्वास सोडा. कोपरे वाकवा आणि धड जमिनीवर टेकवा या आसनाची दोन ते तीन वेळा पुनरावृत्ती करा आणि विसावा घ्या . 

परिणाम : हे आसन  म्हणजे दुखावलेल्या पाठीच्या कण्यावर रामबाण उपाय आहे.  कण्याच्या चकत्या सरकलेल्या असतील तर हे आसन केल्यामुळे त्या मुळच्या  या जागी येतात पाठीच्या कण्याचा भाग सदृढ बनतो आणि छाती पूर्णपणे फुगवली जाते. 
Post a Comment

0 Comments