योगसाधना
धनुरासन
धनु म्हणजे धनुष्य या आसनात डोके धड व पाय यांना वर खेचण्यासाठी हाताचा उपयोग धनुष्याच्या दोरी प्रमाणे केला जातो आणि या आसनात शरीर वाकवलेल्या धनुष्या सारखे दिसते.
पद्धती :
1)जमिनीवर पाय लांब करून पालथे झोपा श्वास सोडा आणि गुडघे वाकवा हात पाठीमागे येताना दावा घोटा डाव्या हाताच्या आणि उजवा घोटा उजव्या हाताने पकडा दोनदा श्वास घ्या.
2) श्वास पूर्णपणे बाहेर सोडा आणि गुडघे जमिनी वर उचलून दोन्ही पाय वर घ्या आणि त्याचवेळी छाती ही जमिनीवर उचला याप्रमाणे शरीर वाढवण्यासाठी हात व हाताचे पंजे दोरी प्रमाणे कार्य करतात.
3) डोके वर उचलून ते जास्तीत जास्त मागे खेचा बरगड्या आणि ओटीपोटात जमिनीवर टेकवून असा शरीराचा भार फक्त पोटावर असू द्या.
4) पाय वर उचलताना गुडघे एकमेकांशी जुळवून नका कारण त्यामुळे पाय पुरेसे उंच उचलता येणार नाहीत पाय पूर्णपणे वर उचलले गेले की मग मांड्या गुडघे आणि घोटे एकमेकाशी जुळवा .
5) पोट ताणले गेल्याने श्वसन वेगाने होऊ लागते परंतु त्याबद्दल चिंता करू नका वीस सेकंदात पासून ते एक मिनिटापर्यंत शक्यतो जास्तीत जास्त वेळ या आसनात रहा.
6) नंतर श्वास सोडून घोट्या वरील पकड सोडा. पाय लांब करा डोके आणि पाय जमिनीवर येऊ द्या आणि विसावा घ्या.
परिणाम : या आसनात पाठीचा कणा मागच्या बाजूस ताणला जातो वयस्कर व्यक्ती नेहमीच या हालचालींमध्ये तसे करत नसल्याने त्यांच्या कण्यामध्ये ताठरपणा येतो या आसनामुळे पाठीच्या कण्याला पुन्हा लवचिकपणा येऊ लागतो आणि पोटातील स्नायूंना सदृढता येते कण्यातील चकत्या सरकलेल्या व्यक्ती सक्तीची विश्रांती किंवा शस्त्रक्रिया हे उपाय करावे न लागता धनुरासन आणि शलभासन ही आसने नियमितपणे केल्यामुळे सुधारण्याचा अनुभव आहे.
0 Comments