आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हरभरा डाळीच्या पिठाचे पराठे 

साहित्य - 1 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप हरभराडाळीचे पीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे,1 चमचा कसुरी मेथी, 1/2 चमचा ओवा,1/2 चमचा जिरे,हिंग,गरममसालापूड,तेल गरजेनुसार.

कृती -

सर्वप्रथम एका भांड्यात हरभराडाळीचे पीठ,हिंग,गरम मसाला, तिखट,हळद सर्व जिन्नस एकत्र करा. चवीप्रमाणे मीठ आणि तेल घालून मिसळा. आता गव्हाच्या पिठात लागत लागत पाणी घालून पोळ्यांसाठी मळतो तशी कणीक मळून घ्या. या कणकेच्या लाट्या किंवा लहान लहान गोळे बनवून लाटून घ्या. त्या लाटलेल्या पोळी मध्ये हरभरा डाळीचे तयार केलेले मिश्रण भरा आणि सगळी कडून बंद करून लाटून घ्या.

तयार पोळी गरम तव्यावर घालून थोडं तेल सोडून दोन्ही कडून सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. गरम हरभराडाळीचे पराठे खाण्यासाठी तयार हे पराठे दह्यासह किंवा चटणीसह सर्व्ह करा.Post a Comment

0 Comments