शबनमची फाशीची शिक्षा माफ करावी :महंत परमहंस दास

शबनमची फाशीची शिक्षा माफ करावी :महंत परमहंस दास 

वेब टीम अयोध्या : शबनमची फाशीची शिक्षा माफ केली जावी, अशी मागणी अयोध्येतील तपस्वी छावनीचे महंत

परमहंस दास यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केलीय. शबनमला फाशी दिली गेली तर स्वातंत्र्योत्तर काळात एखाद्या महिलेला फाशी देण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

महंत परमहंस दास यांनी राष्ट्रपतींकडे ही मागणी केलीय. 'हिंदू शास्त्रांनुसार महिलेचं स्थान पुरुषांहून खूप उच्च असतं. एका महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन समाजाचं भलं होणार नाही.  शबनम हिचे अपराध क्षमायोग्य नाही परंतु, एक महिला असल्यानं तिचे अपराध माफ केले जावेत' असं महंत परमहंस दास यांनी म्हटलंय. 

'हिंदू धर्माचा गुरु म्हणून मी राष्ट्रपतींकडे ही विनंती  करतोय की शबनम हिची दया याचिका स्वीकार केली जावी. तुरुंगात आपल्या गुन्ह्यासाठी तीनं प्रायश्चित्त घेतलं आहे. तिला फाशीची शिक्षा दिली गेली तर हा इतिहासातील अत्यंत दुर्दैवी क्षण ठरेल.  राष्ट्रपतींनी शबनम हिची दया याचिका स्वीकार करावी' असंही परमहंस यांनी म्हटलंय.

उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील बाबनखेडी गावात १४-१५ एप्रिल २००८ रोजी रात्री उशिरा आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या कुटुंबातील साद सदस्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या शबनम आणि तिचा प्रियकर सलीम यांना फाशी दिली जाणार आहे. शबनम जुलै २०१९ पासून रामपूर तुरुंगात  आहे.

Post a Comment

0 Comments