गर्दीचा फायदा घेऊन सिटी बस मध्ये चोरी करणारा गजाआड

 गर्दीचा फायदा घेऊन सिटी बस मध्ये चोरी करणारा गजाआड 

४ लाख ९२ हजाराचा माल जप्त 

वेब टीम पुणे :  पीएमपीएमएल बसमधील  गर्दीचा फायदा घेत  महिलांचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ४ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला . आरोपीने आणखी काही ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

संतोष शरणाप्पा जाधव (वय ३६, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बसमधील वयोवृद्ध महिलांना हेरून तो त्यांच्याकडील दागिने चोरी करत होता. गुन्हे शाखा युनिट ५ चे पथक गस्त घालत असतानाच, संतोष हा बसमधून चढउतार करत असल्याचे दिसून आले. संशयावरून त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशांकडील किंमती वस्तू चोरीच्या घटनात  वाढ झाल्याने . त्या चोरीच्या घटनांचा तपास सुरू होता . युनिट ५ चे पोलीस हवालदार अजय गायकवाड आणि चेतन चव्हाण हे मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्याचवेळी एक संशयित तरूण बसमधून चढउतार करत असल्याचे दिसून आले. त्याला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी अंती  त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. वानवडी, स्वारगेट, दत्तवाडी या भागांत त्याने चार चोऱ्या केल्याची कबुली दिली . त्याच्याकडून १० तोळे दागिने हस्तगत केले आहेत. जप्त केलेल्या दागिन्यांची किंमत ४ लाख ९२ हजार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत. 

Post a Comment

0 Comments