आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माह की  दाल

 साहित्य : दोन वाट्या काळे उडीद ,अर्धी वाटी हरभरा डाळ ,मुठभर राजमा (ऐच्छिक )दोन मोठे कांदे ,तीन मोठे टोमॅटो ,७-८ लसूण पाकळ्या वाटून घ्या, ३ टेबलस्पून तूप अथवा रिफाईंड तेल ,दोन टीस्पून लाल तिखट ,अर्धा टी स्पून हळद ,चवीनुसार मीठ ,दोन तीन हिरव्या मिरच्या, मुठभर चिरलेली कोथिंबीर 

कृती : 

1) डाळ करायच्या आदल्या दिवशी रात्री उडीद स्वच्छ निवडून भिजून ठेवावेत.  त्यातच हरभरा डाळ भिजत घालावी . आवडत असल्यास मुठभर राजमा घालावा.  भिजवताना चिमूटभर सोडा घाला. 

2) दुसऱ्या दिवशी सकाळी डाळीतले सोड्याचे पाणी काढून टाकून डाळ प्रेशर कुकर मध्ये घालावी.  डाळीच्या दुप्पट पाणी घालावे त्यात एक कांदा चिरून घालावा बाकीचे उरलेले निम्मे आले, थोडी हळद ,एक चमचा मीठ घालून शिजायला ठेवावी .  


3) डाळ शिजायला वेळ लागतो पूर्ण प्रेशरवर सहा मिनिटे अथवा चार शिट्ट्या  द्याव्यात.   कांदा बारीक चिरून टोमॅटो बारीक चिरून व आले लसूण बारीक वाटून घ्यावे.  

4) कढईत तूप गरम करून एक चमचा जिरे घालावे, फोडणीत कांदा घालावा कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की वाटलेले आले लसूण दोन चमचे गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट व अर्धा चमचा हळद घालून परतावे.  मसाला खमंग परतला गेला कि टोमॅटो घालावे . टोमॅटो शिजवून एकजीव  झाले की शिजलेली डाळ घालावी.  डाळ रवीने अथवा डावाने घोटून एकजीव करावी.  

5)ही डाळ दाटसर  ठेवायची  असल्यास  आवश्यकते नुसार थोडे पाणी घालावे चवीनुसार मीठ घालावे व उकळू द्यावी डाळ  उतरण्यापूर्वी ३-४ बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर त्यात घालावी व उतरवावी.  

6) वरील साहित्याची सहा वाट्या दाटसर डाळ होते चार माणसांना पुरते.  साधा भात जीरा राईस किंवा पराठ्याबरोबर चांगली लागते.  वाढताना वरून पांढरे लोणी अथवा अमूल बटर घालावे. 

 टीप : 

1) डाळ शिजवताना एकजीव शिजवली पाहिजे डावाने अथवा चांगले घोटून घ्यावी चोथा पाणी होता कामा नये पाणी जास्त वाटल्यास आठवावे. 

2) ही  उडदाची डाळ सालासकट घ्यायची.  अत्यंत पौष्टिक असते व शिजवल्यावर फिकट होत नाही. 

Post a Comment

0 Comments