तप्त दिव्य (भाग -१)

 तप्त दिव्य (भाग -१)

 पूर्वी खरे-खोटे तपासण्यासाठी दिव्य केले जात होते.  त्यावेळेला आजच्यासारखे वेळ खाऊ कोर्टकचेरीचे काम नव्हते साधारणता निजामशाही काळापासून ते इंग्रज काळापर्यंत असे खरे-खोटे तपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिव्य केले जात होते.  (उदाहरणार्थ उकळत्या तेलांमधून  पैसे काढणे आदी)  नगरच्या संग्रहालयाच्या लायब्ररीमध्ये' द शाहू आणि पेशवे दप्तर' या पुस्तकांमध्ये वतनाची निवाडा पत्रे मूळ मोडी लिपीतील आहेत  त्याचे लिप्यांतराचे निवाडा पत्रे वतन पत्रे या पत्रांचा मजकूर या पुस्तकांमध्ये छापला आहे.  त्यामध्ये दहाव्या क्रमांकाचे पत्र आहे कल्याण प्रांतांमधील साकसे परगणे तळकोकण यासी  दिले वतन पत्र त्याचा मजकूर ' नारायण व खंडू नारायण प्रभू उपनाम कर्णिक देशपांडे  पेन पंचमहाल  परगणे साकसे  प्रांत कल्याण तळकोकण यासी दिले वतन पत्र असे,  जे तुम्ही शाहूनगर नजीक किल्ले सातारा येथील मुक्कामी स्वामी संनिध येऊन विनंती केली की परगणे मजकूरचे  देशपांडेपणाचे दरोबस्त वतन पुरातन आपले  वडील वालजी झिमाजी व आप्पाजी झिमाजी हे वृत्ती   अनुभवित  असता देवजी दत्ताजी व गणेश दत्ताजी प्रभू यांचे वडील केशव प्रभू देशपांडेपणाची गुमास्ते गिरी सांगितली तो मुशारा घेऊन देशपांडेपणाचे काम करीत होता. वालजी  प्रभू घाटावर चाकरीस  गेले., मागे केशव प्रभूने देशमुख व अधिकारी यांच्याशी  मिलताव  करून दप्तर आपले घरी आणून रयतेची समजवीस करून कारभार करू लागले.  त्या काळात झिमानी  घाटावरून घरास आला त्याने केशव प्रभू याचा कारभार देखून  चितांत  असाह्य  मानून त्याचे घरचे दप्तर आपले घरी आणून कारभार करू लागले . त्यावर केशव प्रभू गुमास्तयांसी  असह्य झाले त्यांनी देसाई व अधिकारी यांची अंतस्थ करून त्याची विरुद्ध अतिशय वाढविला.

  वालजी व आप्पाजी यासी मारून वृत्ती  आपण करावी ऐसा इत्यर्थ  करून देसाई व अधिकारी यांसी संकेत करून वालजी व आप्पाजी कसबेवासी  परगणे मजकूर येथे राहात होते,त्याजवरी  देशमुखाची स्वारी  नेवून  वालजी प्रभू वाशी मध्ये वनस्पती म्हणून शेत आहे तेथे जीवे मारीला व आप्पाजी प्रभू पळून ठाणे पेण येथे जात होता तो कुकड खिंड  म्हणून आहे तेथे लोक ठेवीले होते त्यांनी व वाशीहून धावणे त्याचे पाठिलागास गेले त्यांनी मिळोन आप्पाजी शेत खिंडीत गाठोन मारिला ऐसे दोघे भाऊ मारिले. आप्पाजी प्रभूची बायको सगर्भ होती तीस मारावे म्हणून लोक फिरून वाशीस गेले ती बायको मुकादम मुसलमान बायको वाशीस होती. तिचे घरी जाऊन तिजला शरण आली. तिने अभय देऊन संदूकेत घालून वरती आपण बैसली . स्वारीच्या लोकांनी तमाम गावातील घरे शोधली ,मोकादमाच्या घराचाही झाडा घेतला  परंतु बायको सापडली नाही लोक उठून गेली  त्या उपरी रात्रीची होडी  व माणसे देऊन जलमार्गे फिरंगाणा   तर्फेस  पावती केली . तेथे थारा धरून राहिली प्रसूत झालीयावर 

तिजला पुत्र जाहला त्याचे नाव गोविंद प्रभू . हे बायकोस पळविल्याचे वर्तमान केशव प्रभूस कळताच  देशमुखास  सांगून मोकादमणीस जिवे  मारली तिचे  दोघे लेक  मारीले.  त्याजवर  गोविंदप्रभू प्रौढ  झाला . वतनाचे वर्तमान आईच्या मुखे  सविस्तर ऐकून मलिकअंबरा  कडे जाऊन फिर्याद दिली.  त्यांनी त्याची हकीकत मनास आणून वतनाची तहकीकात करून वृत्तीचे परवाने करून दिले.  ते घेऊन घरास आला  परवाने दाखविले वतनावर तो माय म्हणो  लागली जे,  तू येकटा वतनावरी   गेलीयाने  अपाय होईल. व वंश बुडल याच करिता वर्तनावर  जाऊ नको तुझे पोटी संतान  झाल्यावर  जाण्याचा विचार कर ऐसी बोध करोन करून शपथ घालून राहिवीली.  इतक्यात घर जळाले त्यामध्ये मलिकअंबर परवाने होते ते दग्ध  जाहले . गोविंद प्रभु ने आपले लग्न केले तेच प्रानती राहिला, तेथे त्याचे पोटी पुत्र संतान झाले . पुत्र  चौघे त्यांची नावे बापूजी प्रभू ,विठ्ठल प्रभू ,पांडुरंग प्रभू , गोपजी प्रभू येणे प्रमाणे चौघे पुत्र  यामध्ये गोपजी प्रभू व विठ्ठल प्रभू चा पुत्र सूर्याजी प्रभू हे दोघे चुलते पुतणे महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामींचे सेवेसी किल्ले रायगड येथे जाऊन फिर्याद दिली . इतकीयात स्वामी कर्नाटकच्या स्वारीस जावयास निघाले. 

पोलादपूर मुक्कामी गोपजी व सूर्याची विठ्ठल यांनी विनंती केली त्यावर साहेब मसलती वरून आल्यावर इंसाफ करतील असे म्हणून घरास  जाण्याची आज्ञा केली पुढे पिढी दर पिढी झगडे चालू होते . भाऊ राजश्री कानोजी आंग्रे सरखेल होते त्याजकडे कुलाबियास गेले. नारो रघुनाथ  कल्याणचा महजर घेऊन सरखेल मशार  जिल्हेस  दाखविला तो महजर पाहून पंचाईतावर इन्साफ  सोपविला . वादीयाचे वडील आपले वडिलांनी गुमास्ते ठेवले असता त्यांचे खून करून वतन चालू लागले त्यावर साक्षी देसाई मजकुराने साक्ष दिली.  नार प्रभु वतनदार खरा त्याच्या वडिलांनी दत्ताजी प्रभूच्या वडीलास गुमास्तेगिरी  सांगितली होती.  त्यास  आपल्या वडिलांनी दत्ताजी प्रभूच्या  वडिलांचा प्रतीपक्ष धरून नार प्रभूच्या वडिलांचा खून केला . व वाशीकरीण  मुकादमीन  नार प्रभु चे मयतास  होती म्हणून तिचे पाठीकडून  काळीज काढले व तिची दोन मुले मारली. वाशीकर  मुकादम बावाखान याने साक्ष दिली कि  प्रभू वतनदार खरा.  मौजे उंबर्डे येथील कुलकर्णी वेठ प्रभू व विठ्ठलभाऊ प्रभू बाळाजी गंभीरराव आदाकारी तपेछातीस परगणे मजकूर यांनी ही साक्ष दिली . ,वाटण नारो रघुनाथ यांचे  खरे.  दत्ताजी व बाजीप्रभू यांच्या वडिलांचा खून करून वतनाचा उपभोग घेतात  या प्रमाणे साक्षी पूर वल्यानंतर पंचाईत यांनी सदरहू  राजश्री सरखेल मांसाहार जिल्हेस दाखल केल्या. (अपूर्ण )


Post a Comment

0 Comments