तृतीयपंथी समाजाचा बुलंद आवाज दिशा पिंकी शेख यांना स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी. महाले पुरस्कार जाहीर

तृतीयपंथी समाजाचा बुलंद आवाज दिशा पिंकी शेख यांना स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी. महाले पुरस्कार जाहीर 

पुरस्काराचे स्वरूप :  मानपत्र, मानचिन्ह,पुस्तके व  रोख रक्कम

    वेब टीम  नगर - विचारधारा, जिज्ञासा अकादमी आणि मातृ संघटना राष्ट्र सेवादल यांच्या संयुक्तपणे देण्यात येणारा स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी.महाले स्मृती पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरयेथीलङॠइढ ( लेस्बियन,गे, बायोसेक्शुअल,ट्रान्सजेन्डर)च्या समूहाच्या प्रतिनिधी, कवयत्री, नाट्यलेखिका, स्तंभ लेखिका, वक्ता आणि महाराष्ट्र राज्यातील पहिली ट्रांसजेंडर प्रदेश प्रवक्ता.तृतीयपंथी समाजाचा बुलंद आवाज असलेल्या दिशा पिंकी शेख यांना स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी.महाले स्मृती पुरस्कारजाहीरझाल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे व विचारधाराचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल अंभी बुलबुले यांनी दिली.

दिशा शेख मुळे पुरस्काराला वेगळे कोंदण मिळाले

     या वर्षीचा डॉ. महाले पुरस्कार दिशा पिंकी शेख यांना जाहीर झाल्याने यापुरस्काराला यावर्षी वेगळे कोंदण मिळाले आहे असे विचारधाराचे अध्यक्ष  विठ्ठल बुलबुले म्हणाले.   पिढ्यानपिढ्या समाजातील या समूहाकडेइथल्याव्यवस्थेने, समाजाने दुर्लक्ष केले, उपेक्षा केली, अवहेलना केली, त्यांनामाणूस म्हणून सन्मान दिला नाही, तरी हा तृतीयपंथी समाज जिद्दीने चीवटपणे आपले प्रश्नकमांडत राहिला, कधी टाळ्या वाजवून लक्ष वेधले तर कधी विविध मंचावरयेवून स्त्री पुरुषांचे, सरकारचे प्रबोधन केले आणि समाजात, व्यवस्थेत, आपली जागा निर्माण केली, त्यांच्या जिद्दीला, त्यांच्याधडपडीला, त्यांच्या कर्तुत्वाला या पुरस्काराच्या निमित्ताने आम्ही सलाम करीत आहोत. दिशा शेख यांना पुरस्कार देवून हे आम्ही सांगू इच्छितो की, या समुहा सोबत आम्ही खंभीरपणे उभे आहोत. अध्यक्षविठ्ठल बुलबुले म्हणाले

    विचारधारा व जिज्ञासा अकादमी या संस्थेच्या माध्यमातून १९९८पासून स्वातंत्र्यसेनानी डॉ.एस.टी. महाले स्मृती पुरस्कार दिला जातो. यापूर्वी डॉ महाले पुरस्कार, मालेगावचे आरोग्य सेवा व तरुणाईत कार्य करणारे सर्वोदयी नेते डॉ.सुगन बरंठ, आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणार्याग,नर्मदा आंदोलनात नेतृत्व केलेल्या तळोदाच्या प्रतिभा शिंदे आणि भूकंपातील अनाथ मुलांसाठी आपलं घरच्या माध्यमातून कार्य केलेल्या उस्मानाबाद - नळदुर्गचे कैलास चिनगुंडे, विडीकामगारांसाठी आयुष्य समर्पित केलेले संगमनेरचे साथी सायन्ना येनगंदुल,आरोग्य,व्यसनमुक्ती व दंगल मुक्त अहमदनगर, दंगल मुक्त भारत यासाठी कार्य करणार्यान युनुस तांबटकर, विविध आंदोलने करणारे ठाणे येथील संजीव साने, सावित्रीउत्सव सुरु करण्यार्यार मुंबईच्या शरद कदमआणि मागील वर्षी गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या पुणे येथील दत्ता भंडार यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. अशीमाहिती राष्ट्र सेवादल संघटक बापू जोशी व जिज्ञासा अकादमीच्या प्रा संगीता गाडेकर यांनी दिली.

     एस.एम.जोशी फाउंडेशन पुणे येथे निवड समितीचे अध्यक्ष, एस.एम जोशी फॉन्डेशनचे सचिव, प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत निवड समितीचे सदस्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, (धुळे) छात्रभारतीच्या प्रा.बिना सावंत (अकोले) डॉ.उदय महाले (अहमदनगर)व्यंकटेश आरकल, युनुस तांबटकर  (पुणे) व निवड समितीचे निमंत्रक प्रा. विठ्ठल बुलबुले हे उपस्थित होते. पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांची नावे सुचविण्यात आली होती. त्या नावातून पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.

दिशा पिंकी शेख यांचा परिचय

     दिशा पिंकी  सामाजिककार्यकर्ती,लेखिका, कवयत्री,नाट्यलेखिका, स्तंभ लेखिका, आणि वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र राज्यातील पहिली ट्रांसजेंडर प्रदेश प्रवक्ता. त्यांनी२०१७मध्ये वर्षभरदिव्य मराठी मध्ये उबळ नावाचा कॉलम लिहीला होतामहाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद,अहमदनगर. जागतिक मराठी साहित्य परिषद,पुणे येथे मुलाखती  सोबतच २०१८  मुंबईत सुरु झालेल्या पहिल्या सावित्री बाई फुले साहित्य संमेलनात अध्यक्ष होत्या, पुणे येथील पहिल्या विद्रोही युवा साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. बर्यामच शाळा, कॉलेजेस, विद्यापीठ सामाजिक कार्यक्रमांमधून समुदायाचे आणि श्रसलींरळहिंसमूहाचा भाग म्हणून सहभाग नोंदवला आहे. वक्ता म्हणून प्रश्ना मांडत असतात, समाजाचे प्रबोधन केले

       लवकरच मान्यरांच्य हस्ते पुरस्काराचे वितरण येथे होणार असल्याची माहिती राष्ट्र सेवादल संघटक बापू जोशी व जिज्ञासा अकादमीचे पियुष मंडलेचा यांनी दिली. (फोटो-दिशा )


Post a Comment

0 Comments