मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना : पादहस्तासन



पाद म्हणजे पाय आणि मस्त म्हणजे हात हे आसन  पुढे वाकून आणि आपल्या हातावर उभे राहून करायचे असते. 

 पद्धती :

१) ताडासनात  उभे राहा  पायांमध्ये एक फूट अंतर ठेवा. 

२) श्वास सोडा पुढे वाका आणि गुढगा  न वाकवता पावलांखाली हात सरकवा तळहात आणि चवडे एकमेकांशी जुळलेले राहावेत. 

३) डोके वर उचलून धरा आणि पाठ जास्तीत जास्त अंतर्गोलाकृतीत  ठेवा गुडघ्यावरील पकड सैल  न करता या स्थितीत काही वेळ श्वसन करा.  

४) आता श्वास सोडा आणि कोपरे वाकवून व तळहाता पासून पावले वर खेचून डोके गुडघ्यामध्ये न्या . या स्थितीत नेहमीसारखे श्वसन करत वीस सेकंद रहा ५) श्वास घ्या डोके वर उचला आणि क्रमांक दोनच्या स्थिती या.डोके चांगले वर उचललेले असू द्या दोनदा श्वास घ्या.  

६) श्वास घ्या उठा आणि ताडासनात उभे रहा. 

पादांगुष्ठ आसन आणि पादहस्तासन त्यांचे परिणाम 

 पहिल्या आसनापेक्षा दुसरे आसन  अधिक मेहनतीचे आहे.  परंतु दोघांचेही परिणाम सारखेच आहेत पोटातील अवयव या आसनामुळे सुधारतात  आणि पाचक   रसाची निर्मिती वाढते . यकृत आणि प्लिहा  यांचा मंदपणा नाहीसा होतो.  पोटाचा फुगवठा किंवा जठारविषयक  त्रास ज्यांना होत असेल त्यांना या दोन आसनाचा लाभ होतो.  पाठीच्या अंतर्गोलाकार  स्थितीतच पाठीच्या मणक्यातील सरकलेल्या चकत्या जागच्याजागी बसतात. जर कण्यातील  चकती  निखळलेली असेल तर डोके गुडघ्यामध्ये आणू नका.  मणक्यामधील चकत्या सरकलेल्या  व्यक्तींना फायदा झाला झाल्याचे आढळून आले आहे मात्र हे आसन करण्यापूर्वी गुरूंचे मार्गदर्शन घेतले पाहिजे, कारण पाठीची अंतर्गोल  स्थिती साधणे  ताबडतोब शक्य नसते . या आसनाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी इतर दुय्यम आसनांवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार : अवियल 

साहित्य : पाव किलो सुरण सोलून पातळ लांब तुकडे करून, पाव किलो कोहळा सोलून  तसेच लांबट तुकडे करुन,  दोन कच्ची केळी सोलून त्याचे लांबट तुकडे,  शेवग्याच्या शेंगा सोलून लांब तुकडे ,पाव किलो लाल भोपळा सोलून लांब तुकडे,  वालपापडी  शिरा काढून ,एक मोठा नारळ खोवुन दहा-बारा हिरव्या मिरच्या , 2 चमचे जिरे, दोन वाट्या आंबट दही , कढीलिंब ,पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ , रिफाइंड तेल तीन डाव . 

कृती : 

१)सर्व भाज्या एक सारख्या लांबट चिरून पाण्यात उकळून चाळणीवर निथळत ठेवावेत.खूप शिजवू नयेत.  

२) नारळ मिरच्या व जिरे एकत्र बारीक वाटावे व  दही कढीलिंब व चवीनुसार मीठ घालून परत शिजायला ठेवावे.

३) मंद आचेवर भाजी पूर्ण शिजवून उतरवावी  व वाढायच्या भांड्यात काढावी.  

४) भाजी काढल्यावर वरून तेल गरम करून त्यावर घालावे आवडीनुसार कमी जास्त घालावे. 

 टीप :

 १) सर्व भाज्या उकडलेल्या  असल्याने सुरेख चव येते.  

२) केरळ मध्ये यात वरून नारळाचे तेल घालतात आवडत असल्यास रिफाइण्ड तेलाऐवजी नारळाचे तेल घालावे.

 

Post a Comment

0 Comments