पारंपरिक संगीत,आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेल्या " संगीत जातकयज्ञ"चा प्रयोग रंगला

पारंपरिक संगीत,आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेल्या "संगीत जातकयज्ञ"चा प्रयोग रंगला  

वेब टीम नगर : आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट,श्रुती संगीत निकेतन यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या "संगीत जातकयज्ञ" या डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेल्या महर्षी अगस्ती यांच्या जीवनावरील नवीन संगीत नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.पारंपारिक संगीत नाटक व आधुनिक तंत्रज्ञान याने नटलेल्या या संगीत नाटकाने प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. 

प्रारंभी डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे लिखित संगीत जातकयज्ञ या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन पूर्णवादी विचाराचे प्रणेते गुणेश महाराज पारनेरकर, ह.भ.प अशोकानंद महाराज कर्डीले , राजेंद्र महाराज नवले,किसनशेठ लहामगे,के.डी.धुमाळ ,नंदलालजी मणियार, विनायकराव पवळे, डॉ.बागवान,डॉ. सु.प्र.कुलकर्णी,प्राचार्य प्रकाश टाकळकर, प्राचार्य म.ना.बोपर्डीकर, मकरंद खरवंडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

नगर जिल्ह्यातील या पहिल्याच संगीत नाटकात महर्षी अगस्ती - देवीप्रसाद सोहनी, नारद - संकेत शाह, शिवगण - समीर कुलकर्णी आणि किरण डिडवाणीया , विदर्भराज - अनिकेत देऊळगावकर, लोपामुद्रा - सायली बोपर्डीकर-भवर, विदर्भराज्ञी श्रीदिव्या - डॉ.धनश्री खरवंडीकर,राजपुरोहित आणि सेनापती - प्रकाश कुलकर्णी,प्रधानजी - सोहम सौंदणकर यांनी प्रमुख भूमिका केल्या.ब्रह्मा-विष्णू-शिवस्वरूप, खंत मनी कशी सांगू मी,  लावण्य सुंदर,सुंदर ते ध्यान,अशा एकाहून एक सरस पदांनी नटलेल्या संगीत नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त पणे दाद दिली या नाटकातील पदांना समर्पक संगीत व प्रसंगांना उचित असे पार्श्वसंगीत मकरंद खरवंडीकर यांनी दिले.लोपामुद्रा आणि इग्मवाह दृढस्युत  यांच्या जातकाची कथा डॉ.सहस्त्रबुद्धे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून समर्थपणे उतरले आहे. 

या नाटकाचे दिग्दर्शन स्व.जयमाला शिलेदार यांच्या शिष्या डॉ.धनश्री खरवंडीकर यांनी केले ऑर्गनवर मकरंद खरवंडीकर ,तबल्यावर प्रसाद सुवर्णपाठकी व टाळाची साथ आनंद कुलकर्णी यांनी केली. चंद्रकांत सैंदाणे यांची रंगभूषा, नेपथ्य - नाना मोरे,प्रकाशयोजना - मुन्ना सय्यद,वेशभूषा- पुनम कुलकर्णी,  केशभूषा - सविता भैरी, ध्वनीयोजना - रवी जाधव या सर्व कलाकारांमुळे या नाटकाची शोभा अधिकच वाढली. या नाटकाचे पार्श्वसंगीत संयोजन संकेत सुवर्णपाठकी यांनी केले. श्रुती संगीत निकेतनच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या महोत्सवास पूर्णवादी विचाराचे प्रणेते गुणेश महाराज पारनेरकर ह.भ.प अशोकानंद महाराज कर्डीले , राजेंद्र महाराज नवले,किसानशेठ लहामगे,के.डी.धुमाळ ,नंदलालजी मणियार, विनायकराव पवळे, डॉ.बागवान,डॉ. सु.प्र.कुलकर्णी,प्राचार्य प्रकाश टाकळकर, प्राचार्य म.ना.बोपर्डीकर,डॉ.जयंत देशपांडे, अनंत जोशी, दीपक शर्मा ,अशोक गुर्जर, हेमंत काळे, लक्ष्मणराव डहाळे ,अशोक गांधी ,पवन नाईक, निलेश खळीकर असे संगीत व नाट्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.सूत्रसंचालन उमा देशपांडे यांनी केले.  

Post a Comment

0 Comments