नगरटुडे बुलेटीन 08-02-2021

 नगरटुडे  बुलेटीन 08-02-2021

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नागरिकांच्या सहकार्याने या भागातील विकास कामे पुर्णत्वास येत आहेत

अविनाश घुले : प्रभाग क्र.११ सारसनगर, गाडळकर मळा येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

     वेब टीम  नगर : प्रभाग 11 हा विस्ताराने मोठा आहे, तरीही प्रत्येक भागात मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. गाडळकर मळा परिसरात लोकवसाहती वाढत आहे, या वसाहतीमधील नागरिकांना सर्व सुविधा पुरविणे गरजेचे आहे. या परिसरात टप्प्याटप्प्याने विकास काम होत असल्याने अनेक वसाहतींची संख्याही वाढत आहे. मुलभुत सुविधा पूर्ण होत असल्याने नागरिकही या परिसरास पसंती देत आहेत. या भागात रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन या मुलभूत सुविधांबरोबरच  ज्येष्ठ नागरिक, मुले-महिलांसाठी  जॉगिंग पार्क, उद्यानासारखे विकास कामेही पुढील काळात करणार आहोत. नागरिकांचे सहकार्याने जास्तीत जास्त निधी या भागातील कामांसाठी आणण्यात येईल, असे प्रतिपादन नगरसेवक अविनाश घुले यांनी केले.

     प्रभाग क्र.११ सारसनगर, गाडळकर मळा ते राजवर्धन अपार्टमेंट येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक अरुणराव गाडळकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगरसेवक अविनाश घुले, संतोष जाधव, अजय लांडगे, ओम राजगुरु, चेतन मेहेर, दिलीप मगर, अमित गाडळकर, चंद्रकांत अमृते, राहुल गाडळकर, प्रविण कानगुडे, अ‍ॅड.अमोल गावडे, अर्जुन भाबड आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक अरुणराव गाडळकर म्हणाले, या भागात नव्याने वसाहती होत असल्याने या भागातील नागरिकांच्या रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईनसारख्या मुलभूत सुविधा आवश्यक आहेत. त्यासाठी नगरसेवक अविनाश घुले यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी या भागातील आवश्यक सुविधांना प्राधान्य देऊन कामे करत आहेत. आज ड्रेनेज लाईनची सुविधा झाल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. भविष्यात या कामांमुळे हा भाग चांगल्या प्रकारे विकसित होईल.

     याप्रसंगी संतोष जाधव, ओम राजगुरु यांनीही नगरसेवक अविनाश घुले हे या भागात करत असलेल्या विविध कामांचे कौतुक करुन आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबीराची आवश्यकता 

पुरुषोत्तम गांधी : कौडगाव जांब येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

    वेब टीम  नगर : आज आरोग्य सेवा महाग होत आहे, त्यामुळे अनेकजण आपले दुखणे अंगावरच काढतात, परिणामी पुढे त्याचे मोठ्या आजारात रुपांत होत असते. त्यासाठी प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे. ग्रामिण भागात आरोग्याबाबत जागृती व उपचार होणे आवश्यक आहे. अशा मोफत शिबीराच्या माध्यमातून येथील नागरिकांची नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने ही कौतुकास्पद बाब आहे. अशा शिबीराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्याचे मोठे काम आयोजकांनी केले आहे. अशी शिबीरे नियमित ग्रामीण भागात झाली पाहिजे असे सांगून बँकांच्या विविध लाभदायी योजनांची माहिती महाराष्ट्र बँकेचे माजी मॅनेजर पुरुषोत्तम गांधी यांनी दिली.

     नगर तालुक्यातील कौडगाव जांब येथे ग्रामस्थ व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या  शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र बँकेचे माजीव्यवस्थापक  पुरुषोत्तम गांधी व राम शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून  करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब धीवर, अण्णा थोरात,  घोलप सर, भाऊसाहेब धिवर, परसराम खरसे, अण्णा जगताप, प्रभाकर धिवर, संभाजी फुलमाळी, विक्रम ठोंबरे, पोपट वाघ, माजी सरपंच बबनराव पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

     राम शिंदे म्हणाले, ग्रामीण भागात शैक्षणिक व आरोग्याबाबत जागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी युवकांनी पुढकार घेऊन असे सामाजिक उपक्रम राबविले पाहिजे.  अशा शिबीराच्या माध्यमातून चांगला पायंडा पडत आहे असे सांगून आयोजक बाबासाहेब धीवर यांचे कौतुक केले.

      या शिबीरात बुधराणी हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व स्टाफने  ३५०रुग्णांची तपासणी केली त्यातील ६५रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या शिबीरास पंचक्रोशितील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरीसाठी

निमगाव वाघात १८ फेब्रुवारीला कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

वेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथे गुरुवार दि. १८ फेब्रुवारी रोजी ६४ व्या  वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत २०२०-२१ स्पर्धेसाठी नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नगर तालुक्यातील कुस्तीगिरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव बाळू भापकर, उपाध्यक्ष काशिनाथ पळसकर, सहसचिव सुभाष नरवडे, खजिनदार किसन वाबळे, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

या स्पर्धेचे शुभारंभ जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी आठ ते दहा या वेळेत वजनासाठी मल्लांना उपस्थित रहावे. वजनानंतर कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पंच म्हणून एनआयएस कुस्ती कोच गणेश जाधव व प्रियंका डोंगरे काम पाहणार आहेत. स्पर्धेसाठी५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६,९२, ९७ व महाराष्ट्र केसरी गटसाठी ८६ ते १२५ किलो वजनगट (गादी व माती) देण्यात आले आहेत. स्पर्धेला येताना खेळाडूंनी खेळाडूंनी पासपोर्ट फोटे व आधारकार्ड सोबत आनणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पै. नाना डोंगरे ९२२६७३५३४६ यांना सपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनात आरोग्यासाठी उपयुक्त असलेले योग, प्राणायामाचे महत्त्व  कळले 

प्रा. बाळासाहेब निमसे : तपोवन रोड येथील संचारनगर येथे निःशुल्क प्राणायाम वर्गाचे उद्घाटन

वेब टीम नगर : कोरोनाच्या संकटकाळात नागरिक आरोग्याप्रती जागृक झाले. तर आरोग्यासाठी उपयुक्त असलेले योग, प्राणायामाचे महत्त्व सर्वसामान्यांना कळले. प्रदुषणमय वातावरणात श्‍वसनाचे अनेक आजार नागरिकांना जडत असून, श्‍वसन तंत्र बलवान बनविण्यासाठी भश्रीका प्राणायाम अत्यंत प्रभावी असल्याचे प्रतिपादन प्रा. बाळासाहेब निमसे यांनी केले.  

अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीने तपोवन रोड येथील संचारनगर माऊली मंदिरात कायमस्वरूपी स्थायी निःशुल्क प्राणायाम वर्गाचे उद्घाटन प्रा. निमसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पहाटे ६ ते ७ या वेळेत सुरु झालेल्या निःशुल्क प्राणायाम वर्गास परिसरातील नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला आहे.

पुढे बोलताना प्रा. निमसे म्हणाले की, कोविड-१९ मध्ये ज्या व्यक्तीचे श्‍वसन तंत्र मजबूत आहे. त्या व्यक्तीला कोरोनाचे गंभीर परिणाम भोगावे लागले नाही. कोविड पॉझिटिव्ह असला तरी श्‍वसन तंत्र मजबूत असल्याने त्यांच्यामध्ये रोगाचे सौम्य लक्षण दिसून आले. श्‍वसन तंत्र मजबूत असेल तर कोरोनासह इतर आजारांचा देखील आपण प्रतिकार करु शकतो. स्वामी रामदेवजी महाराज यांनी पहाटे आठ प्राणायाम करणे जरुरी असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये भश्रीका प्राणायाम अत्यंत महत्वाचे आहे. भश्रीका प्राणायाम करण्याची पद्धत अत्यंत सोपी असून, अडीच सेकंद श्‍वास फफ्फुसात भरायचा आणि न रोखता तो पुन्हा अडीच सेकंदात सोडायचा ही क्रिया किमान ५मी करावी लागते. यामुळे फफ्फुस बलवान बनून शरीराच्या संपूर्ण अवयवांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

समितीच्या वतीने योगशिक्षक हेमंत फिरके व स्मिता फिरके माऊली मंदिरात प्राणायाम वर्ग घेणार आहेत. यामध्ये योगगुरु स्वामी रामदेवजी महाराज यांचा संपूर्ण  योगाचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकासह शिकविला जाणार आहे. हे शिबीर मोफत असून नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पतंजली समितीच्या पुढाकाराने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ज्योत्स्ना महाजन, मधुकर निकम, बाळासाहेब जाधव, शिवाजी चाफे, रुपाली चाफे, भरती क्षिसागर आदी परिश्रम घेत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वारुळाचा मारुती परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने : पाणी, भुयारी गटार योजना व पथदिव्यांची मागणी

वेब टीम नगर : शहरातील वारुळाचा मारुती येथील नागरिकांना अनेक वर्षापासून नागरी सुविधा मिळत नसल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या टंगळ-मंगळ अनागोंदी कारभाराचा सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

शहरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढून महापालिकेने २०१६साली वारुळाचा मारुती येथे त्यांचे पुनर्वसन केले. येथे २४०फ्लॅटमध्ये सुमारे दीड हजार नागरिक राहतात. तसेच या प्रकल्पा शेजारी असलेल्या २४०फ्लॅटमध्ये महापालिकेचे सफाई कर्मचारी राहतात. मात्र येथील नागरिकांना पाणी, स्वच्छता व लाईटचे प्रश्‍न अद्यापि सोडविण्यात आलेले नाहीत. या प्रकल्पासाठी व येथील नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करुन २०१५ साली पाण्याची टाकी बांधण्यात आली. टाकी बांधून पडिक अवस्थेत असून, त्यामधून नागरिकांना पाणी वाटपासाठी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आलेली नाही. पाच वर्षात थेंबभर पाणी या टाकीत आलेले नाही. पिण्यासाठी येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अजूनही टँकरने या भागात पाणीपुरवठा सुरु आहे. अनियमीतपणे टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच या भागात भूयारी गटार योजना नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. उघड्या गटारी व डासांचा उच्छादामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या भागात पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्री बाहेर पडता येत नाही. तर अंधारामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

या भागाची संघटनेच्या वतीने नुकतीच पहाणी करण्यात आली. नागरिकांना महापालिका प्रशासनाच्या टंगळ-मंगळ अनागोंदी कारभारामुळे त्रास सहन करावा लागत असून, सदर भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा मिळण्यासाठी स्थानिक नागरिकांसह संघटनांच्या वतीने महापालिकेत दि.२७ फेब्रुवारी रोजी सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments