मूलमंत्र आरोग्याचा
योग्यसाधना
प्रसारित पादहस्तासन
प्रसारित म्हणजे विस्तारलेला फैलावलेला किंवा पुढे ताणलेला पाद म्हणजे पाऊल या आसनामध्ये पसरलेले पाय अतिशय ताणले जातात
पद्धती :
1) ताडासनातं उभे राहा, श्वास घ्या कमरेवर हात ठेवा आणि पावलां मध्ये चार ते साडेचार फूट अंतर ठेवून उभे रहा.
2)गुडघ्याच्या वाट्या वर खेचून पायताणा श्वास सोडा आणि पावलां मध्ये व खांद्याच्या ओळीत दोन्ही हात जमिनीवर टेकवा.
3) श्वास घ्या पाठीचा बाक अंतर्गोल ठेवून डोके वर उचला.
4) श्वास सोडा कोपरे वाकवा आणि टाळू जमिनीवर टेकवा शरीराचा भार पायावर घ्या शरीराचा भार डोक्यावर जाऊ देऊ नका दोन्ही पावले आणि तळ हात ,डोके ही एका रेषेत असावीत .
5) दीर्घ आणि समतोल श्वसन करत या स्थितीत अर्धे मिनिट हे रहा.
6) श्वास घ्या डोके जमिनीवरून उचला आणि वाकलेली कोपरे ताठ करा पाठीला अंतर्गोल बाक देऊन डोके जास्तीत जास्त वर उचलून धरा.
7) श्वास सोडा आणि कमरेवर हात ठेवा आणि पावलां मध्ये चार ते साडेचार फूट अंतर ठेवून उभे रहा. ९)उडी मारून ताडासनातं या .
परिणाम : या आसनामुळे गुडघ्या मागील शिरा आणि अवयव वर उचलणारे स्नायू पूर्णपणे विकसित होतात. त्याच वेळी धड आणि डोके यांच्याकडे रक्त प्रवाह वाहू लागतो ज्या लोकांना शिरसासन करणे शक्य नसते त्यांना या आसनापासून फायदा होईल या आसनाने पचनशक्ती वाढते. वर वर्णन केलेली उभे राहून करण्याची आसने नवशिक्यांसाठी आवश्यक आहेत अभ्यासकांची पुढे प्रगती होऊ लागली म्हणजे त्याच्या अंगी अधिक लवचिक मला येऊ लागते . मग उभे राहून करण्याची आसन नाही केले तरी चालते, तरीही असे आठवड्यातून एकदा करणे हिताचे असते उभे राहून करण्याच्या सर्व सणांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
0 Comments