मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना

 मूलमंत्र आरोग्याचा

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
पार्श्वोत्तानासन  

 पार्श्व म्हणजे कूस  किंवा बाजू उत्तान म्हणजे ताणणे  या असनाच् छातीची एकेक बाजू अतिशय चांगली ताणली जाते. 

पद्धती - ताडासनात  उभे रहा. दीर्घ श्वास घ्या शरीर पुढल्या बाजूस ताणा 

२)  पाठीच्या मागे तळहात जुळवा आणि खांदे व कोपरे मागे ओढा .श्वास सोडा आणि मनगटे वळवून दोन्ही तळहात वर छातीच्या मागच्या बाजूच्या मध्याच्या वरील बाजूस न्या. बोटे खांद्याच्या पात्याच्या पातळीला असू द्या ,म्हणजे पाठीमागून नमस्ते केल्यासारखी स्थिती होईल . 

३) श्वास घ्या आणि उडी मारून दोन बाजूस तीन ते साडेतीन फूट अंतरावर ठेवा त्याच स्थितीत राहून श्वास सोडा.

 ४) श्वास घ्या आणि धड उजवीकडे व उजवे पाऊल नव्वद अंशांनी उजवीकडे वळवा, बोटे आणि टाच धडाच्या  रेषेत असू द्या, डावे पाऊल पाया सहित ७५ ते ८० अंशांनी उजवीकडे वळवा डावे पाऊल  लांबवून धरा व पाय गुडघ्याशी घट्ट आवळलेला असू द्या, डोके पाठीमागे नेलेले असू द्या . 

५) श्वास सोडा आणि डोके उजव्या गुडघ्यावर टेकवा.  पाठिला  ताण  द्या आणि हळूहळू मान लांबवून प्रथम नाक, नंतर ओठ  आणि शेवटी हनुवटी उजव्या गुडघ्याला लावून उजव्या गुडघ्या पलीकडे टेकवा . दोन्ही गुडघ्यांच्या वाट्यावर खेचून दोन्ही पाय घट्ट आवळून धरा.  

६)या स्थितीत वीस सेकंद ते अर्धा मिनिट नेहमीसारखे श्वसन करत रहा, मग सावकाश कमरे भोवती धडाला झोका देऊन डोके आणि डाव्या गुडघ्या कडे वळवा,त्याच वेळी डावे  पाऊल  ९० अंशांनी डावीकडे आणि उजवे पाऊल ७५ ते ८० अंशांनी डावीकडे वळवा  आता धड आणि डोके उजवा पाय न वाकवता  उचलून शक्य तितके  मागे न्या, ही कृती एकदा श्वास घेताना झाली पाहिजे. 

७)श्वास सोडा धड पुढे  वाकवा डोके डाव्या गुडघ्यावर ठेकवा आणि मान लांबवून हनुवटी डाव्या गुडघ्यापली कडे जाऊ द्या.  

८) या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करत २० सेकंद ते अर्धा मिनिट रहा नंतर श्वास घ्या डोके मध्यावर आणा आणि बोटे पुढे राहतील अशा तऱ्हेने पावले मूळ स्थितीला आणा  मग धडवर उचला. 

९) श्वास सोडा आणि उडी मारून ताडासनात या पाठीमागे जुळलेले हात सोडा.  

१०) पाठीमागच्या बाजूला नमस्कार याप्रमाणे हात जुळवता येत नसतील तर फक्त मनगट पकडा आणि वर सांगितल्याप्रमाणे आसन  करा. 

 परिणाम : या आसनामुळे पायामधला आणि कमरेच्या स्नायूंचा ताठरपणा नाहीसा होतो कमरेचे सांधे व कणा यामध्ये लवचिकता येते.  डोके जेव्हा गुडघ्यावर टेकलेले असते त्यावेळी पोटातील अवयव आकुंचित होतात, आणि सदृढ बनतात मनगटे सहजपणे वळू लागतात आणि त्यामधील कसलाही ताठरपणा निघून जातो या आसनामुळे उतरते खांदे कणखर  बनतात हे आसन  योग्य तऱ्हेने केले तर खांदे चांगलेच मागे खेचले जातात.  त्यामुळे दीर्घश्वसन सुलभ बनते. 



Post a Comment

0 Comments