जबरी चोरीतला मुद्देमाल विकत घेणारा आरोपी मुद्देमालासह नाशिक येथून जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वेब टीम नगर : दि : ११/११/२०२० रोजी फिर्यादी संजय संभाजी पाटक वय २३, रा- घाटशिरस, ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर हे शहापुर पेट्रोलपंपा जवळ त्यांची मोटार सायकल रस्त्याचे कडेला उभी करुन लघुशंकेसाठी गेले असता कोणीतरी अज्ञात गुन्हेगाराने अज्ञात हत्याराने डोक्यात मारहाण करुन १००००/- रु. किंमतीची प्लॅटीना बजाज मोटार सायकल, ७०००/- रु. किंमतीचा विवो कंपनीचा ४ ९५ मॉडेलचा मोबाईल व ३००/- रु. रोख असा एकुण १७३००/- रु. किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गु.र.नं.1 २८९९/२०२० भादविक ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्या नंतर पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे व त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने समांतर तपास करीत असतांना, पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील मोबाईल फोन हा करणे रोकडे, शिवनगर, नाशिक याचेकडे असल्याची खात्रिशिर माहिती मिळाल्याने पथकातील पोहेकॉ/सखाराम मोटे, विश्वास बेरड, पोना/शंकर चौधरी, राव सोनटक्के, दिपक
शिदे, पोकॉ/सागर सुलाने, मयुर गायकवाड, सागर ससाणे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांनी नाशिक येथे जावुन आरोपीचे
वास्तव्या बाबत माहिती काढुन आरोपी नामे करण सोमनाथ रोकडे वय २०, रा. निलगिरीबाग, शिवनगर झोपडपट्टी,आडगांव, ता. जिल्हा नाशिक यास ताब्यात घेवुन, मोबाईल बाबत चौकशी केली असता त्याने गुन्हयातील चोरलेला
मोबाईल समक्ष हजर केल्याने तो जप्त करण्यात आला, या बाबत अधिक चौकशी केली असता सदर मोबाईल हा १) जॉन चलन पडेची रा. देवी मंदीर कॅथॅलिक कॉलनी, देवळाली कॅम्प, जिल्हा नाशिक, २) साहिल सुरेश म्हस्के ऊर्फ मोन्या पाईकराव रा. प्लॉट क्र.४, शिवगंगा अपार्टमेंट, मच्छीमार्केट, नाशिक रोड, जिल्हा नाशिक, ३) हर्ष सुरेश म्हस्के ऊर्फ टोन्या पाईकराव रा. प्लॉट क्र.४, शिवगंगा अपार्टमेंट, मच्छीमार्केट, नाशिक रोड, जिल्हा नाशिक यांचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले आहे. वर नमुद तिन्ही आरोपींचा अधिक शोध घेतला असता सदरचे आरोपी हे उपनगर पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक गु.र.नं. ५५५/२०२० भादविक ३०२, ३९५, ३९७, ९४३, ९४७, ९४८, १४९, १२० (ब) व आर्म अँक्ट ४/२५ या गुन्हयात सेंट्रल जेल, नाशिक येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. बर नमुद गुन्ह्यातील आरोपीस मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी ही मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कूमार आगरवाल अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व अजित पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
0 Comments