मुलानेच केली बापाची हत्या

 मुलानेच केली बापाची हत्या 

वेब टीम संगमनेर : तालुक्यातील आंबी खालसाजवळील खंदरमाळवाडी शिवारातील वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यात एक अनोळखी        पुरुषाचा मृतदेह दि २७ जानेवारी बुधवारी सकाळी आढळून आला होता . या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनील पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक राहुल मदने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली आणि रुग्णवाहीनीतून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील एका रुग्णालयात पाठविले.

या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित तरुणाला अटक केली होती . मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाचे  नाव सिताराम भीमा काळे आहे तर दुसरा तरुण त्याच्या मित्र आहे. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा दोघेही  तरूण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्या चौकशीत  पोलिसांना अडथळा येत होता  .मात्र पोलीस निरीक्षक पाटील यांना सिताराम भीमा काळे याच्यावर जास्त संशय असल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिली मात्र नंतर चौकशी कसून केल्याने त्यांनी धक्कादायक कबुली दिली आहे. त्यात त्याने मयत व्यक्ती भीमा सोमा काळे हा माझा बाप असून मीच त्याची हाती केली आहे. मात्र त्याने हि हत्या का केली हे उघडकीस आलेले नाही.     

Post a Comment

0 Comments