मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 

वृक्षासन


 पद्धती

1. ताडासनात  उभे राहा.

2.उजवा पाय गुडघ्यात वाकवा आणि उजवी टाच डाव्या मांडीच्या मुळाशी ठेवा बोटे जमिनीकडे होऊन ते पाउल डाव्या मांडीवर विसावू द्या. 

3. डाव्या पायावर तोल सावरा  दोन्ही तळहात जुळवून डोक्यावर लांबवा. दीर्घ श्वसन करत काहीसे सेकंद या स्थितीत राहात मग हात खाली घ्या जुळवलेले तळहात एकमेकापासून दूर करा. उजवा पाय सरळ करा आणि ताडासनाची उभे राहा 

4.उजव्या पायावर उभे राहून डावी टाच उजव्या मांडीच्या मुळाशी टेकवा.आधीच्या इतकाच वेळ या स्थितीत उभे राहा. पुन्हा ताडासन करा विसावा घ्या 

परिणाम: 

ह्या आसनामुळे पायाचे स्नायू सुदृढ होतात आणि शरीराला तोल येतो. 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
मक्याचे पॅटिस 

साहित्य: पाव किलो बटाटे उकडून, २०० ग्रा मक्यचे दाणे  उकडून, आलं लसूण पेस्ट, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर,६-७ हिरव्या मिरच्या, २ ब्रेड स्लाइस कुस्करून,चवीनुसार मीठ, थोडी चिरलेली कोथिंबीर , १ वाटी ब्रेड क्रम्स,तेल. 

कृती :

बटाटे कुस्करून घ्यावेत. मक्याचे दाणे अर्धवट ठेचून घ्यावेत. 

बटाटे, ठेचलेले मक्याचे दाणे,आलं लसूण मिरची पेस्ट,मीठ,कॉर्नफ्लोअर, व ब्रेड स्लाइस घालून सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करावे.  

छोटा गोळा करून हातावर चापट करून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून टाळून घ्यावेत व टोमॅटो सॉसब सोबर सर्व्ह कार्रवेत. 


              

 

Post a Comment

0 Comments