मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना , आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
धनुरासन 

भूमिका : या आसनात शरीराची अवस्था धनुष्या प्रमाणे होते म्हणून याला धनुरासन असे म्हटलेले आहे.  प्रत्यंच्या  ताणलेले धनुष्य ज्याप्रमाणे पूर्णपणे ताणात  असते त्याचप्रमाणे या आसनात संपूर्ण शरीर ताणात असते. 

क्रिया : 

आसनस्थिती घेणे 

पूर्वस्थिती विपरीत शयनस्थिती

१)दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि दोन्ही गुडघे साधारणतः सहा ते आठ इंच दूर करून ठेवा. 

२) दोन्ही हातांनी दोन्ही पाय मागे घोट्याजवळ घट्ट पकडा.

 ३) ‍श्वास सोडा व श्‍वास घेत घेत हातांनी पाय पायांनी हात उडून वर उचला व संपूर्ण शरीर ताणले जाऊ द्या पाय वर उचलताना पोटऱ्या  मांड्या पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा.मान  उचलून मागच्या दिशेने वळवा.श्वसन संथपणे चालू ठेवा त्याच अवस्थेत स्थिर राहा .

 आसनस्थिती सोडणे : -

१)  श्वास घ्या श्वास सोडत सोडत दोन्ही गुडघे खांदे व हनुवटी हळूहळू जमिनीवर टेकवा. 

२)घोट्या  जवळील दोन्ही हात सोडून ते पूर्वीच्या जागेवर न्या.

 ३) गुडघ्यात वाकवलेले पाय सरळ करून जमिनीवर टेकवा एकमेकापासून लांब केलेले गुडघे एकमेकांना जुळवून घ्या व विपरीत शयन स्थितीची अवस्था घ्या. 

 कालावधी :  प्रारंभी सुमारे पाच सेकंद हे आसन  स्थिर ठेवता आले तरी पुरे . थोडा सराव झाल्यावर हा कालावधी १० सेकंदापर्यंत वाढवावा व अशा तीन आवृत्त्या कराव्यात याचा एकूण कालावधी तीन मिनिटांपर्यंत वाढवता येतो , पण त्यापासून फायदा मिळण्याकरता कमीत कमी ३० सेकंद पर्यंत तरी हे आसन  स्थिर ठेवता आले पाहिजे संपूर्ण शरीराचे वजन पोटाच्या  स्नायू वर आल्याने तेथून तो दाब पोटातील इंद्रियांपर्यंत पोहोचविला जातो व पाचकरस निर्माण करणार्‍या ग्रंथी यकृत स्वादुपिंड वगैरे वर या दाबाचा अनुकूल परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते पचनाच्या काही तक्रारी यामुळे दूर  होऊ शकतात हात व पायातील शिरा ताणल्या गेल्याने त्यातील रुधिराभिसरण चांगल्याप्रकारे होते. 

 विशेष दक्षता - भुजंगासन सांगितलेली सर्व काळजी याही आसनात  घेणे गरजेचे आहे पोटाचे विकार असणाऱ्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शना शिवाय हे आसन करू नये. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
पंचरंगी खीर 

साहित्य : २५० ग्रॅ खवा,२ लिटर दूध , १ वाटी साखर, २ टे. स्पून बारीक रवा, १ चिमूट सोडा,५-६ वेलदोड्याची पूड , खाण्याचे ४ वेगवेगळे रंग. 

कृती : पाव किलो खव्यामध्ये टे स्पून बारीक रवा , चिमूटभर सोडा, निम्मी वेलदोडा पूड, घालून हाताने एकजीव करून मळावे व त्याचे ५ सारखे भाग करून घ्यावेत . १ भाग तसाच ठेऊन बाकी भागांमध्ये हिरवा, लाल , पिवळा,केशरी रंग घालून सर्व भाग चांगले मळून घ्यावेत व त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून ठेवाव्यात 

२ लिटर दूध उकळून आटवावे. थोडे आतले कि त्यात खव्याच्या गोळ्या सोडाव्यात व सतत ढवळत राहून दूध आटवावे. खव्याच्या गोळ्या दुधात शिजतात व रंगीबेरंगी गोळ्या दुधावर तरंगू लागतात, दूध निम्मे आतले कि त्यात १ वाटी साखर घालून खीर खाली उतरवावी.उरलेली वेलदोडा पूड घालून गार करून सर्व्ह करावी. 

टीप : 

* रवा घातल्याने खव्याच्या गोळ्या सहसा फुटत नाहीत,पण प्रथम दुधात १-२ गोळ्या घालून फुटत नाहीत ते पाहावे. जर फुटल्या तर थोडा रवा आणखी घालावा. 

        

Post a Comment

0 Comments