मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना, आरोग्य आहार (मकर संक्रांति विशेष)

 मूलमंत्र आरोग्याचा 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
शलभासन शलभासन म्हणजे टोळ, या आसनात शरीराची अवस्था काहीशी डोळा प्रमाणे दिसते म्हणून याला शलभासन म्हटले जाते.  विपरीत शयनस्थितीतून दोन्ही पाय वर उचलून स्थिर ठेवणे म्हणजे शलभासन होय.  दोन्ही पाय एकदम उचलण्या  ऐवजी एक पाय वर उचलला तर ते अर्ध शलभासन होते या आसनाचा उल्लेख कोणत्याही जुन्या ग्रंथात नाही.  परंतु पूर्ण शलभासनाची पहिली पायरी म्हणून अर्ध शलभासन याचा प्रथम अभ्यास करणे अधिक सोयीस्कर होईल.

आसनस्थिती घेणे-

 पूर्वस्थिती विपरीत शयनस्थिती

 १) श्वास सोडा व श्वास घेत घेत डावा पाय गुडघ्यात न वाकवता सरळ कमरेपासून सावकाश वर उचला पायाचे चवडे मागच्या दिशेने जाणून घ्या व श्वसन संथपणे सुरू ठेवा. 

आसनस्थिती सोडणे

१)श्वास घ्या व श्वास सोडत सोडत संथपणे डावा पाय खाली आणून जमिनीवर टेकवा व विपरीत स्थिती ही अवस्था घ्या.

अर्ध शलभासन( दक्षिण पक्ष)- उजवा पाय वर करून वरीलप्रमाणेच कृती करा व डाव्या पायाने अर्ध शलभासन पूर्ण करा 

आसनस्थिती-

 अर्ध शलभासन आत एक पाय वर उचलताना तो गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा पाय गुढग्यात वाकवले गेला तर बराच ताण कमी होतो आणि अर्थातच आसनाचे अपेक्षित परिणाम कमी होतात अशा तऱ्हेने पाय सरळ ठेवून तो जास्तीत जास्त वर उचलणे ही या आसनाची आदर्श  अवस्था आहे यावेळी पाय आजूबाजूला वाकू न देणे महत्वाचे यावेळी हनुवटी पुढे जमिनीवर टेकलेली  हवी खांदे ,मान ,डोके वगैरेंचे स्नायू शिथिल ठेवण्याचा प्रयत्न करा मांड्यांचे व पोटाचे स्नायू फक्त ताणलेल्या अवस्थेत राहतात.  प्रारंभी हाताचा रेटा  जमिनीवर देऊन पाय वर उचलण्यास मदत केली तरी चालेल पण नंतर मात्र हातावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ देणे इष्ट नाही एक पाय वर उचलला  नंतर दुसरा पाय मात्र पूर्वी होता त्याच अवस्थेत  स्थिर ठेवणे जरूरीचे  आहे दुसरा पाय वेडावाकडा केला तर या असनाचे अपेक्षित परिणाम अनुभवायला येत नाहीत. 

 कालावधी -

नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे आसन  साधारणपणे पाच सेकंद ती स्थिर ठेवता येत नाही, पण हे आसन  जितका वेळ शक्य होईल तितका वेळ स्थिर ठेवून तशाच आवृत्त्या कराव्यात म्हणजे सरावाने ३० सेकंदापर्यंत तरी हे असं स्थिर ठेवता येईल व या आसनाचा  चांगला फायदा मिळेल पुढेपुढे अभ्यासाने या आसनाचा कालावधी एक मिनिटापर्यंत वाढविण्यास  हरकत नाही.

विशेष दक्षता - पाठीच्या  कणा चा त्रास असल्यास त्यांनी, तसेच कमरेचा त्रास असलेल्यांनी हे आसन  करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार (मकर संक्रांति विशेष)
खव्याची पोळी 

साहित्य : अर्धा किलो खवा,२ वाट्या कणिक , ३ टे तूप , २ मोठे चमचे खसखस, ७-७ वेलदोड्याची पूड, ४ वाट्या पिठीसाखर, ४ वाट्या कणिक,१ चिमूट मीठ,१ वाटी मैदा,१ वाटी बारीक रवा,१ वाटी तेल, तांदळाची पिठी. 

कृती : प्रथम कढईत खवा गुलाबी रंगावर भाजावा. २ वाट्या कणिक तुपावर खमंग भाजावी.खसखस भाजून कुटून घ्यावी. भाजलेला खवा,खसखस,वेलदोडा पूड, पिठीसाखर व भाजलेली कणिक घालून चांगला मळावा. 

 ४ वाट्या कणिक, १ वाटी मैदा , १ वाटी बारीक रवा व एक वाटी तेलाचे कडकडीत मोहन घालून भिजवणे (फार घट्ट न करणे). २ तास कणिक भिजल्यावर मळून घ्यावी. 

कणकेचा छोटा गोळा घेऊन हाताने त्याची वाटी तयार करून कणकेच्या गोळ्या एवढाच खव्याचा गोळा त्यात भरून वाटी बंद करून घ्यावी. तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी पातळ लाटून सपाट तव्यावर मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावी. 

टीप : 

* सारण भरपूर गोड हवे. अगोड पोळ्या चांगल्या लागत नाहीत.                          

* सारण फार कोरडे वाटत असल्यास त्यावर दुधाचा हात लावून मळून घ्यावे. 

* खव्याऐवजी पांढरे पेढे कुस्करून त्यात २ टे संपून पिठीसाखर व दूध घालून मळून सारण केल्यास, झटपट खव्याच्या पोळ्या होतात.  

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments