दिन विशेष : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती

 दिन विशेष : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती   

स्त्रियांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ 

आज जो पुरोगामी महाराष्ट्र उभा आहे त्याला जिजाऊंचे अधिष्ठान लाभलेले  आहे .  त्याचबरोबर जिजाऊंच्या नातलगां विषयीचे आयुष्यही मोठ्या धकाधकीचे , ज्यांनी जन्म दिला ते  आई बाप कायमचे दूरावले ,माहेरही परके झाले.  सासरीही स्थिरता नाही दोन्ही घराण्यांमध्ये वितुष्ट निर्माण झालेले . जिजामातेच्या ठायी एका उच्च व्यक्तीमत्वा सोबतच करारीपणा, आत्मविश्वास,  ममता, वात्सल्य , करुणा, मुत्सुदीपणा, निर्णयशक्ती,  संयम, बाणेदारपणा अशा कितीतरी कलागुणांचे भांडार होते. 

 जिजाऊंच्या कार्याची व्याप्ती व महानता एवढी मोठी आहे की त्यांना आद्य स्त्री समाज सुधारक म्हणणे वावगे ठरणार नाही इच्छाशक्तीच्या बळावर स्वराज्य निर्माण करणे.  अतिशय सुसंस्कृत स्त्री म्हणून जिजाऊंचे व्यक्तिमत्व उठून दिसते.  सुलतानी संकटाच्या मुशीतून परकीय आणि जुलमी राजवटीचा प्रतिकार व्हावा याचा ध्यास निरंतर मनी धरावा याच भूमिकेतून जिजाऊंनी बाल शिवरायांच्या मनात या अमानुष अत्याचाराला प्रतिकार करण्याची भावांना जागवली व स्वप्न साकारले.  शिवरायांची श्रद्धा आपल्या आईवर होती म्हणून आईच त्यांची  प्रेरणाशक्ती होती.  पुणे उध्वस्त झालेले होते लोक पुणे सोडून परागंदा झाले होते . अशा परिस्थितीत पुन्हा पुण्याचे स्वप्न मनी बाळगून गोरगरिबांचे उद्ध्वस्त झालेले संसार जिजाऊंनी पुन्हा उभारले शेतकरी ,कारागीर, निराश्रित, अपंगांना पुन्हा जीवन जगण्याचा आधार दिला. पुणे  सोडून गेलेले पुन्हा परत येण्यासाठी परिस्थिती निर्माण करून जगण्यासाठीचा आत्मविश्वास त्यांनी दिला.  लोकसंघटन ,स्वराज्य, स्वधर्म, स्वाभिमान ,स्वप्न याचे रक्षण होऊ  लागले, मातृत्वाला जे विसरतात ते मातीलाही विसरतात.  जीवनाचे कल्याण मातेच्या कुशीत आणि मातीच्या मुशीत होते . जीवनात एकदा तरी या मातेचा इतिहास वाचावा म्हणजे मृतप्राय झालेल्यांनाही  जगण्याची शक्ती मिळेल.  जिजाऊ या धार्मिक आणि तितक्याच अध्यात्मिक होत्या धर्म आणि नीती यांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व त्यांना पटले होते . धर्म-अधर्म, सत्य-असत्य ,खरे-खोटे, पाप-पुण्य या सर्व बाबींचा जिजाऊ विवेकनिष्ठा जागृत ठेवून न्यायनिवाडा करीत.

 शिवाजी महाराजांवर कठोर शिस्त आणि वक्तशीरपणा चे संस्कार मातेकडून झाले.  देशात सर्वत्र अंदाधुंदी माजली ,रयतेचा कुणी वाली नव्हता, रक्ताचे पाट वाहत होते, भरदिवसा स्त्रियांची अब्रू लुटल्या  जात होत्या, उघडउघड उत्सव- पूजा करणे धोक्याचे होते, सर्वत्र आक्रोश आणि किंकाळ्या, भीतीचे साम्राज्य होते मन सुन्न करणारे होते जिजाऊ समाजकारणी, राजकारणी ,स्वाभिमानी लढवय्या  होत्या म्हणून शिवरायांनाही  परगृही गुरु  शोधण्याचे काम  पडले नाही.  शहाजीराजांच्या मागे  जिजाऊ शिवरायांच्या माता,पित्यां, गुरूही होत्या स्वराज्याची बांधणी करताना सर्वांना समान न्याय, जात- धर्म ,स्पृश्य-अस्पृश्य, स्त्री-पुरुष, श्रेष्ठ-कनिष्ठ असा कोणताच भेदभाव निर्माण होऊ दिला नाही . प्रसंगी स्वकीयां कडून होणारा त्रास हा प्रसंगानुसार कठोर शिक्षा देऊन निपटून काढला दोन महाप्रतापी राजांना   घडवणारी ,दुष्टांचे निर्दालन करणारी, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा ,स्वतंत्र राज्याचे स्वप्न साकारणारी  संकटाशी मुकाबला करणारी ,जाधव-भोसले कुटुंबाचे वैर  संपवणाऱ्या  त्या  आदर्श माता, आदर्श प्रतीक होत्या.  अशा या  मातेस कोटी कोटी अभिवादन. 

Post a Comment

0 Comments