दुचाकिला हूल मारल्याच्या कारणावरून तलवारीने वार केले

दुचाकिला हूल मारल्याच्या कारणावरून तलवारीने वार केले 

तिघांवर गुन्हा दाखल 

वेब टीम श्रीगोंदा :  दुचाकीला हूल मारल्याच्या किरकोळ कारणातून खुनी हल्ला करत तलवारीने वार करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जोशीवस्तीवर दि २८ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत तेजस उत्तम वंजीरे (वय ३१ )रा .श्रीगोंदा कारखाना यांच्या फिर्यादीवरून हा खुनी हल्ला करणारे ऊमेश शिवाजी वेताळ  2.सुशांत ऊर्फ सोन्या शामराव गुंजाळ  3.कमलेश ऊर्फ कमलाकर श्यामराव गुंजाळ सर्व रा.जोशीवस्ती ,लिंपणगाव ता.श्रीगोंदा या तिघांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच आर्मऍक्ट व ऍट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत कळलेली माहिती अशी तेजस वंजीरे यांच्या भावाच्या दुचाकीला सदर आरोपींनी हूल मारली त्यातून किरकोळ वाद झाला हा वाद काही राजकीय लोकांनी मध्यस्थी करून मिटवला होता परंतु आरोपींनी फिर्यादी वंजीरे हे जोशींवस्तीकडे जात असताना त्यांना जीवे ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्यावर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केले सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव हे करत आहेत.


Post a Comment

0 Comments