मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना, आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
वीरभद्रासन-३ 

हे आसन म्हणजे वीरभद्रासन-१ च्या पुढचा अधिक कठीण असा टप्पा होय. 

 पद्धती -

१) ताडासनात  उभे राहा  दीर्घ श्वास घ्या आणि पावलं मध्ये चार ते साडेचार फूट अंतर राहील अशा तऱ्हेने उडी मारून उभे  राहा . 

२) वीरभद्रासन १ या आसनातील शेवटची स्थिती उजव्या बाजूने करा. 

३) श्वास सोडा, धड पुढे  वाकवा आणि छाती उजव्या मांडीवर टेकवा हात असू द्या आणि तळहात  एकमेकांशी जुळवा दोनदा श्वास घेऊन होईपर्यंत या स्थितीत राहा.

४) श्‍वास सोडा आणि शरीर किंचित पुढे झुकून डावा पाय जमिनीवरून उचला आणि त्याच वेळी उजवा पाय पहारी सारखा ताठ करा डावा पाय असा वळवा की पायाचा पुढला भाग जमिनीशी समांतर राहील. 

वीरभद्रासन १

५) दीर्घ आणि समतोल श्वसन करत २०  ते ३० सेकंद त्याचा स्थितीत रहा. 

६)तोल  सांभाळतांना उजवा पाय सोडून बाकी सर्व शरीर जमिनीशी समांतर ठेवा उजवा पाय पूर्णपणे ताणलेला आणि ताठ असावा तसेच तो जमिनीशी काटकोनात ठेवावा उजव्या मांडीची मागची बाजू खेचून धरा आणि जणू काही दोन व्यक्ती दोन बाजूकडून उडत आहेत अशा तऱ्हेने हात आणि डावा पाय ताणून धरा.  

७) श्वास सोडा आणि पुन्हा वीरभद्रासन -१मध्ये या. 

८) हे आसन पुन्हा डाव्याबाजूने करा. 

परिणाम : या आसनामुळे शरीराला डौलदारपणा समतोल पाळा लयबद्धता आणि सामर्थ्य यांचा लाभ कसा होतो ते दिसे या आसनामुळे पोटाचे स्नायू आकुंचित आणि सदृढ बनतात आणि पायांच्या स्नायुंना सुंदर आकार व कणखरपणा प्राप्त होतो . धावण्याचा व्यायाम करणार्‍यांनी हे असं अवश्य करावे कारण ते जोम आणि चपलता देणारे आहे या आसनामुळे माणसाचा उभे राहण्याचा आणि चालण्याचा डौल सुधारतो आपण टाचांवर सर्व भार तोलून चुकीच्या पद्धतीने उभे राहतो त्यामुळे आपल्या समतोल वाढीला पायबंद बसतो व करण्याचा लवचिकपणा कमी होतो तासांवर भार देऊन उभे राहणे यामुळे पोट पुढे येऊ लागते आणि शारीरिक व मानसिक चापल्य  कमी होते.  या आसनामुळे पायाच्या चवड्यांवर थांबणारे उभे राहण्याची सवय लागते पोटाचे स्नायू आकुंचित राहतात शरीर व मन तल्लख बनते. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
व्हेजी कटलेट्स 

साहित्य : १ वाटी मटार. ४ उकडलेले बटाटे,जाडसर किसलेल गाजर पाव किलो, १ वाटी फ्लॉवर , १ वाटी पानकोबी, १ च गरम मसाला, १ च चमचा लाल तिखट, १ च आम चूर पावडर , चवीनुसार मीठ., २ टेबलस्पून मैदा किंवा ४ ब्रेड स्लाइस कुस्करून , तेल , आलं लसूण मिरची पेस्ट, ब्रेड क्रम्ज १ वाटी. 

कृती : 

१ चमचा तेल कढईत गरम करून त्यात मटार, पानकोबी, फ्लॉवर, किसलेला गाजर घालून मंद आचेवर वाफवून घ्यावे. 

सर्व भाज्या शिजल्या कि त्यात बटाटे कुस्करून घालावेत व गरम मसाला, आलं लसूण मिरची पेस्ट, आमचूर पावडर१ , लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून सर्व नीट एकत्रित करून घ्यावे व त्यात २ टेबलस्पून मैदा घालून नीट मिसळून घ्यावे. कढईतुन काढून  घ्यावे.

पाहिज त्या आकाराचे कटलेट्स करून घ्यावेत व कटलेट्स दोन्ही बाजूंनी ब्रेड क्रम्ज मध्ये घोळवून गुलाबी रंगावर तळावेत.

सॉस सोबत सर्व्ह करावेत.         

  ------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments