भोसरी पोलिसांची मोठी कारवाई
२४ पिस्तुलांसह ३८ जिवंत काडतूसेही जप्त
वेब टीम पिंपरी चिंचवड : भोसरी पोलिसांनी मोठी कारवाई करत२४ पिस्तूल आणि ३८ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी एकूण १२आरोपींना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलिसांनी मध्यप्रदेशात सापळा रचून कारवाई केली आहे. यातील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
खून, दरोडा, जबरी चोरी यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपी रुपेश पाटील याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४ पिस्तूल आणि ४ काडतुसासह अटक केली. त्याने हे पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणल्याचे सांगितले. यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर भोसरी पोलिसांचे एक विशेष पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले.
विशेष पथकाने मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील वरल्यात उमर्टी गावातील जंगलात सापळा रचला. यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन पिस्तूलचा मुख्य डीलर रॉनी उर्फ बबलूसिंग बरनाला याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण ८पिस्तूल आणि २० जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली.
यानंतर रॉनीचा मध्यप्रदेश येथील साथीदार कालू उर्फ सुशील मांगिलाल पावरा याला २ पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली.
0 Comments