प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ओबीसी व्हीजेएनटी ची जनगणना करा

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ओबीसी व्हीजेएनटी ची जनगणना करा 

माउली मामा गायकवाड : ओबीसी व्हीजेएनटी च्या वतीने ध्वजारोहण 

वेब टीम नगर : देश स्वतंत्र होऊन ७३ वर्षे लोटली मात्र देशातील ओबीसी , व्हीजेएनटी समाजाला न्याय मिळाला नाही. आज प्रजासत्ताकदिना निमित्त केंद्र सरकारने ओबीसी व्हीजेएनटी चे जनगणना सुरु करावी असे मत बाराबलुतेदार संघाचे अध्यक्ष माउली मामा गायकवाड यांनी केले.

ओबीसी व्हीजेएनटीच्या प्रजासत्ताकाच्या ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी माउली मामा गायकवाड यांच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ओबीसी व्हीजेएनटी शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

नुकताच शहरात ओबीसी व्हीजेएनटी मेळावा पार पडला या मेळाव्याबाबत सर्व श्रेष्ठींनी अनुकूल मत प्रदर्शित केल्याने नगर च्या संघटनेचा हुरूप वाढला असून लवकरच कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आल. यापुढील काळात सामाजिक उपक्रम, थोर पुरुषांच्या जयंत्या, स्मृतीदीना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात  येतील  असे बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेना उपप्रमुख आनंद लहामगे ओबीसी शहराध्यक्ष अनिल निकम, मठमंदिर समितीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ डोळसे, रामदास आहेर, श्रीकांत मांढरे,रमेश सानप,राजेंद्र पडोळे, शामराव औटी, अनिल ईवळे, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, शशिकांत पवार ,अभिजित कांबळे, डॉ. सुदर्शन गोरे आदी. उपस्थित होते.हरिभाऊ डोळसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर आनंद लहामगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.          


Post a Comment

0 Comments