प्रजासत्ताकदिनी अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी खुले


 प्रजासत्ताकदिनी अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी खुले



वेब टीम नगर : प्रजासत्ताकदिनी अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी खुले. आठशेहून अधिक दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तूंचा अनमोल ठेवा असलेले अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय प्रजासत्ताकदीना निमित्त सर्वांसाठी खुले राहणार आहे. नुकतेच या वस्तू संग्रहालयाने कात टाकली असून नव्या आकर्षक मांडणीत हे वस्तू संग्रहालय अधिक खुलून दिसते. 


देवदेवतांच्या प्राचीन मूर्तींचे दालन, गणेश दालन , काष्ठ शिल्प , हळपावत यांचे गारगोटे संग्रहालय, शस्त्र दालन, नाणी संग्रह, प्राचीन वस्तू विभाग, अर्वाचीन विभाग, अक्षम युगीनकाळातील दुर्मिळ वस्तू, जुनी हस्त  लिखिते यांशिवाय अन्य बऱ्याच वस्तू या संग्रहालयात  पाहायला मिळतात.

वर उल्लेख केलेली सर्व दालने प्रेक्षकांना पाहण्यासाठी सज्ज असून याव्यतिरिक्त वृत्तपत्र विभाग आणि अन्य काही दालनांची उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. हे संग्रहालय पाहण्यासाठी प्रौढांसाठी ५० रु. तर विद्यार्थ्यांसाठी २० रु. असे प्रवेश शुल्क असून अभ्यासकांसाठी १०० रु., परदेशी पर्यटकांसाठी २०० रु. आणि छायाचित्रणासाठी विशेष शुल्क ५० रु. आकारले जाणार आहे.                

अश्मयुगीन काळापासून ते अगदी अलीकडच्या म्हणजेच पेशवेकालीन आणि तदनंतरच्या वस्तू या संग्रहालयात असून प्रत्येकाने एकदातरी या संग्रहालयाला भेट द्यावी अशीच या संग्रहालयाची उभारणी होत आहे.  

Post a Comment

0 Comments