अनोळखी व्यक्तीने केली ५२ वर्षीय व्यक्तीची हत्या

 अनोळखी व्यक्तीने केली ५२ वर्षीय व्यक्तीची हत्या 

दहा लग्न, तीन बायका सोडून गेल्या, त्याचा झाला भयानक शेवट

वेब टीम बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीत एक धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. येथील भोजीपुरा परिसरात बुधवारी रात्री एका ५२ वर्षांच्या व्यक्तीची हत्या झाली. त्या व्यक्तीने १० पेक्षा जास्त लग्ने केली होती. त्याची हत्या अनोळखी व्यक्तींनी केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

जगनलाल यादव या शेतकऱ्याला वारसाहक्काने कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळाली होती. त्याच्यासोबत राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाच्या नावावर तो ती संपत्ती करणार होता. तो तरूण जगनलाल याचा दत्तक पुत्र होता असे समजते. सूत्रांनुसार, जगनलालच्या या निर्णयामुळे त्याचा मोठा भाऊ नाराज झाला होता, अशी माहिती मिळते.

जगनलाल याचे पहिले लग्न ९० च्या दशकाच्या सुरुवातीला झाले होते. त्याच्या पाच बायका मरण पावल्या होत्या. तर तीन बायका त्याला सोडून गेल्या होत्या. त्याच्या अजूनही दोन बायका आहेत. त्या दोघीही पश्चिम बंगालच्या आहेत. त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल माहिती नव्हती, असा दावा त्याच्या दोन्ही बायकांनी केला आहे. जगनलाल याचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता. त्याची मफलरने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्याची हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगनलाल याची हत्या गळा आवळून करण्यात आली आहे, असे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याच्या डोक्यावर जखमाही झाल्या होत्या. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले असून, मफलरने गळा आवळून ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments