पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आगीच्या तडाख्यात : पाच जणांचा मृत्यू

 पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आगीच्या तडाख्यात : पाच जणांचा मृत्यू 


वेब टीम पुणे : करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली असून चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १०गाड्यांनी   आग विझवण्यासाठी शर्थीचे केले . अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित होते . 

कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली असून सध्या देशभरात लसीकरणास सुरु आहे. मांजरी येथील याच ठिकाणी लसीचं उत्पादन केलं जात होतं. ज्या इमारतीमध्ये आग लागली आहे तेथून जवळच प्रोडक्शन प्लांट आहे.या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे.महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही.आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही . 

दरम्यान आजुबाजूला लोकवस्ती असल्याने आगीची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.   अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पाच मजल्यांची इमारत असून तीन माळ्यांवर आग पसरली आहे. धुराचं प्रमाण जास्त आहे. चार लोक अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती.

“जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं मात्र तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझली असून सर्व काही नियंत्रणात आहे”.

“आग विझल्यानंतर आत जाऊन पाहिलं असता पाच मृतदेह सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मला ही माहिती दिली,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी यावेळी कोव्हिशिल्ड लसीला कोणताही फटका बसला नसल्याचं यावेळी सांगितलं. दरम्यान याप्रकरणी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. पोलीस तपासासोबत फायर ऑडिटही केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे -प्रतिक पाष्टे – डेक्कन पुणे,महेंद्र इंगळे – पुणे,रमाशंकर हरिजन – उत्तर प्रदेश,बिपीन सरोज – उत्तर प्रदेश. सुशीलकुमार पांडे – बिहार अशी मृतांची नावे आहेत 

दरम्यान या आगीची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन डी आर एफ )ची टीम पुण्यात दाखल झाली आहे. या आगीची गुप्तचर यंत्राने मार्फत चौकशी केली जाणारा आहे. 

Post a Comment

0 Comments