मूलमंत्र आरोग्याचा : आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
मटार पॅटिस 

साहित्य :अर्धा किलो मटार, मीठ - साखर चवीनुसार,४ मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या - अर्धा इंच आलं वाटून , १ लिंबाचा रस , फोडणीचे साहित्य, अर्धा किलो बटाटे ,४ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, मीठ मिरपूड , तेल . 

कृती : बटाटे उकडून थोडे गरम असतानाच किसून घ्यावेत व त्यात थोडे मीठ मिरपूड घालून ३ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालून तेलाच्या हाताने मळून घ्यावेत. 

१ टेबलस्पून तेल , मोहरी, हिंग व किंचित हळद घालून फोडणी करावी.त्यात मटार घालून पातळीवर पाण्याचे झाकण ठेऊन मटार वाफवून घ्यावेत. 

पातेली खाली उतरवून वाफवलेले मटार चमच्याने थोडे चेपून घ्यावेत. त्यात वाटलेलं आलं ,लसूण ,मिरची, एका लिंबाचा रस , मीठ साखर घालून सारण मिसळून घ्यावे.      

किसलेल्या  बटाट्याचा छोटा गोळा घेऊन त्याला कोर्नफ्लोअरचा हात लावून त्याची वाटी करून घ्यावी व त्यात १ चमचाभर मटारचे सारण घालून त्याचे  पॅटिस करून घ्यावेत . साधारण १६ पॅटिस होतात. 

पॅटिस तेलावर गुलाबी रंगावर टाळावेत व गरमागरम आवडेल त्या चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावेत. 

टीप : पॅटिसचे आतले सारण आवडीनुसार कोणत्याही भाजीचे करावे.सारण खूप ओलसर असले तरी पॅटिस फुटतात. अशा वेळी सारण कोरडे करायला ब्रेड क्रम्स मिसळाव्यात म्हणजे सारण कोरडे होऊन पॅटिस फुटणार नाहीत.     

   

Post a Comment

0 Comments