बाळ बोठेला दिलासा नाहीच ....

 बाळ बोठेला दिलासा नाहीच .... 

वेब टीम नगर : रेखा जर हत्या कांडातला मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर निर्णय न देताच उलट नोटीस काढण्यात  आहे. पोलिसांचं म्हणणं आल्यानंतरच या प्रकरणावर सुनावणी होणार असून त्यासाठी २८ जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे. 

बाळ बोठे हा गेल्या दीड महिन्यापासून फरार असून आगामी १० दिवसांच्या कालावधी मध्ये बाळ बोठे काय हालचाली करतो , पोलीस त्याच्या अटकेसाठी काय प्रयत्न करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

३० नोव्हेंबर रोजी जातेगाव घाटात रेखा जर यांची हत्या करण्यात आली होती या हत्या कांडातील एक आरोपी सागर भिंगारदिवे यानेच बाळ बोठे हाच या हत्या कांडातील  मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.     

Post a Comment

0 Comments