नवनीत विचार मंचच्यावतीने नवनीतभाई बार्शीकर जन्म शताब्दीनिमित्त रुग्णांना अल्पोपहार

 नवनीत विचार मंचच्यावतीने नवनीतभाई बार्शीकर जन्म शताब्दीनिमित्त रुग्णांना अल्पोपहार

वेब टीम नगर : नवनीतभाई बार्शीकर जन्म शताब्दी निमित्त आशा सुमातीलाल शाह फाउंडेशन सहकार्याने आनंदऋषी रुग्णालयात अल्पोपहार फळे बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मंचचे अध्यक्ष सुधीर मेहता डॉ.  यशोदीपा कांकरिया, कल्पना मेहता, मंचचेे संदीप दिवटे, आबीद दुलेखान, आनंदऋषींनी हॉस्पिटलचे डायलिसिस विभाग प्रमुख तंत्रज्ञ संकेत पुरोहित, तंत्रज्ञ बाळासाहेब लहारे, तुषार गाडेकर, बाळू दळवी, प्रवीण बोर्ड, प्रज्ञा कुलकर्णी, छाया गाडे, रुग्णमित्र नादिर खान आदीसह सर्व स्टाफ रुग्ण आणि नातेवाईक उपस्थित होते.

मंचचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी संतोष बोथरा, डॉ. आशिष भंडारी यांचे आभार मानले. आशा सुमतीलाल शाह फाउंडेशनच्या वतीने  यासाठी सहकार्य लाभले.

डायलिसिस रुग्ण आणि हॉस्पिटल कार्यात मंच सहभागी होऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करेल, असे सुधीर मेहता यांनी सांगितले.  नवनीतभाई जन्मशताब्दी निमित्त माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे आणि सराफ सुभाष मुथा यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पक्ष संस्था आणि समितीच्या माध्यमातून होणारा उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  त्यांनी केले. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९२८४६४०४७७, ९४२३७९३३७५ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Post a Comment

0 Comments