गावठी कट्टे बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

 गावठी कट्टे बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई 

वेब टीम नगर :  ग्रामपंचायत निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध अग्नीशस्त्र धारकांवर कडक कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशावरून  राहुरी पोलिसांनी  पप्पु चेंडवाल या  इसमाला देशी बनावटीचे गावठी कट्टा पिस्तुल बेकायदेशिर, विनापरवाना स्वतःजवळ बाळगत असल्याने ताब्यात घेतले आहे.


  दि १५ जानेवारी २०२१ रोजी नगर जिल्हयात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी अवैध अग्नीशस्त्र धारकांवर कडक कारवाई करण्यासाठीचे आदेश केले होते. त्यासंदर्भाने माहिती घेत असताना दि १३ जानेवारी २०२१ रोजी  अनिल कटके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय माहिती मिळाली की, गुंजाळे, ता. राहुरी येथे एक इसम नामे पप्पु चेंडवाल हा देशी बनावटीचे गावठी कट्टा पिस्तुल बेकायदेशिर, विनापरवाना स्वतःजवळ बाळगत आहे, अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने  अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी त्यांचे पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख, सपोनि राजेंद्र सानप, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, रविकिरण सोनटक्के,दिपक शिंदे पोकॉ रोहित येमुल, मच्छिद्र बडे, विजय धनेधर, मयुर गायकवाड, रविंद्र डुंगासे, मपोकॉ ज्योती शिंदे व चापोहेकॉ उमाकांत गावडे मिळालेल्या माहिती नुसार गुंजाळे गांवात, खंडोबा मंदिराकडे जाणारे रोडवर, ता. राहुरी येथे जावुन सापळा लावुन, बातमीतील इसमास ताब्यात घेवुन. त्यास त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पप्पु ऊर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल वय २४, रा. गुंजाळे, ता. राहुरी. जिल्हा अहमदनगर असे सांगितले. त्यास अंगझडतीचा उद्देश कळवुन त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात तीन देशी बनावटीचे गावठी कट्टेपिस्तुल व तीन जिवंत काडतुसे असे एकुण ९१,५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचासमक्ष जप्त करुन त्यास ताब्यात घेतले आहे. सदर बाबत राहुरी पोलीस स्टेशन । गु.र.नं. ३८/२०२१ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.

नमुद आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत

आरोपी पप्पु ऊर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल याचे विरुध्द दाखल गुन्हे., राहुरी पोलीस स्टेशन - १   चोपडा ग्रामिण, जिल्हा जळगांव पोलीस स्टेशन - १  सोनई पोलीस स्टेशन- १ ,एमआयडीसी पोलीस स्टेशन - ६ ,तोफखाना पोलीस स्टेशन - १. विरगांव, ता. वैजापुर, औरगांबाद - १,शेवगांव पोलीस स्टेशन - १ असे १२ गुन्हे दाखल आहेत.  

सदरची कामगिरी ही मनोज पाटील,पोलीस अधीक्षक, अहमदनगर, दिपाली काळे , अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व संदीप मिटके ,उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे. 

Post a Comment

0 Comments