मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 

वीरासन

 या आसनाला वीरासन का म्हटले जाते याचे निश्चित कारण आज तरी सांगता येत नाही.  वीराच्या म्हणजे योद्धाचा  या आसनाची थोडाफार दुरान्वयाने संबंध लावावा लागतो समोरील शत्रूवर सर्व सामर्थ्यानिशी प्रहार करण्याकरता युद्ध ही स्थितीत  घेतो तशी काही शरीराची स्थिती या  आसनात  होते , म्हणून बहुधा यायला ही संज्ञा प्राप्त झाली असावी.

क्रिया: 

 आसनस्थिती घेणे

 पूर्वस्थिती- दंडस्थिती

१) डावा पाय पुढे टाकून तसे पाहून शरीरापासून जास्तीत जास्त दूर अंतरावर ठेवा 

२) उजव्या पायाचा चवडा उजवीकडे फिरवा

३) दोन्ही हाताने तळवे नमस्कार केल्याप्रमाणे एकमेकाला जोडा व ते डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि डाव्या पायाची मांडी आणि पोटरीच्या चा काटकोन होईल इतके गुडघ्याच्या खाली वाकून ठेवा उजवा पाय सरळ ठेवा 

४) जोडलेले आहात तसेच वर उचलून डोक्यावरून मागच्या दिशेने हात कोपरात न वाकवता मान मागे टाका व दृष्टी मागच्या दिशेने खाली स्थिर ठेवा .

 आसनस्थिती सोडणे 

१)एक शरीराचा तोल सांभाळून जोडलेले हात डाव्या गुडघ्यावर आणा दृष्टीसमोर ठेवा. 

 २) गुडघा सरळ करून दोन्ही हात पूर्वस्थितीला आणा . 

३)उजवा चवडा  पूर्ववत करा

४) डावा पाय  जवळ आणून दंड स्थिती या

 टीप : 

त्याचप्रमाणे उजवा पाय पुढे टाकून हे आसन करा. 

 आसनस्थिती

 या आसनात पुढे टाकलेला पाय शरीरापासून जितका लांब ठेवता येईल तितके आसन  चांगले जमते व त्याचे परिणाम चांगले होतात पुढचा  पाय गुडघ्याशी  काटकोनात वाकलेला व मागचा पाय सरळ ठेवा मागील पाय दोन्ही हात सर्वांचे मिळून सुंदर कमान तयार व्हायला हवी . 

 कालावधी 

या आसनातील ताणाचा फायदा मिळण्याकरिता हे ताण एक मिनिटभर  तरी स्थिर राहायला हवेत .  अभ्यासाने याचा कालावधी तीन मिनिटे वाढवायला हरकत नाही . 

 विशेष दक्षता 

पाठीमागे वाकताना हालचाल पूर्णपणे नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे ,नाहीतर तोल सांभाळणे अवघड होईल आणि सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे अधिक ताण घेतला तर दुखापत होण्याची शक्यता आहे ही हालचाल पूर्णपणे नियंत्रित असेल तर योग्य तेथे थांबता येईल व अयोग्य ताण टाळता येतील. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 

तिळाची बर्फी 

साहित्य : २ वाट्या तीळ भाजून त्याचा कूट करून, १ वाटी दाण्याचा कूट , १०० ग्रॅ खवा,वेलची पूड, ३ वाट्या साखर,२ चमचे सुखे खोबऱ्याचा किस. 

कृती :  तिळाचा व दाण्याचा कूट एकत्र करावा व त्यात खवा मोकळा करून घालावा आणि वरून वेलची पूड घालावी. 

कल्हईच्या पातेल्यात ३ वाट्या साखर, अर्धी वाटी पाणी घालून पाक करायला ठेवावा. पक्का गोळीबंद पाक झाला कि गॅस बंद करावा. तीळ, दाण्याचा कूट व खवा यांचे मिश्रण पाकात घालून चांगले घोटावे.चौकोनी ट्रेला तूप लावून वरील मिश्रण सारखे पसरावे व वरती सुक्या खोबऱ्याचा किस घालून हाताने किंचित दाबावे.गार झाल्यावर छोट्या बर्फीसारख्या वड्या कापाव्यात. 

टीप : 

खवा न घालता पण वड्या  चांगल्या होतात. 

१ वाटी खवलेले खोबरं घालून पण वड्या चांगल्या होतात.               
Post a Comment

0 Comments