अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे सात जण जेरबंद एका मुलीचाही समावेश

 अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे सात जण जेरबंद एका मुलीचाही  समावेश 

वेब टीम नाशिक : नाशकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. नाशिक रोड परिसरातील आरिंगळे मळ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. चाकुचा धाक दाखवून बलात्कार केल्याची पीडितेच्या आईची तक्रार आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी 7 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या सात जणांनी चाकुचा धाक दाखवून पीडितेवर अत्याचार केल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 7 आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलं आणि एका मुलीचाही समावेश आहे

Post a Comment

0 Comments