अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग

 अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग 

जिल्ह्याची पौराणिक धार्मिक आणि सांस्कृतिक माहिती देणारे  अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग हे सदर आजपासून वाचकांच्या दिमतीला येत  असून हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होईल.  

पौराणिक - धार्मिक महत्व असलेला अहमदनगर जिल्हा 

मोहिनीराज मंदिर 

पैस खांब 

अहमदनगर जिल्ह्याला हजारो वर्षांचा धार्मिक इतिहास आहे. अहमदनगर जिल्ह्याचा पूर्ण काळातील धागा रामायण - महाभारत काळापर्यंत जातो. वनवास काळात प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पावन झालेला हा नगर जिल्हा आहे.नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात वाहत असलेलय गोद्गावरी , प्रवरा व मुळा या तीन नद्यांच्या काठावर प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केले आहे.ऋषीमुनींचे आश्रम याच नद्यांच्या तीरावर होते. या विंध्य पर्वतांच्या दक्षिणेस आर्यांच्या वसाहती होत्या. रामायण काळातील पट्ट किल्यावरील जटायूची हकीकत. गोदाकाठच्या सीता हरणाचा सुवर्णमृग पाठलाग राजेगाव ता.नेवासा , पुढे मिरी या गावी सुवर्णमृगाची हत्या केली. त्या वेळेला हरणाने मारीच राक्षसाच्या मूळ रूपात प्राण सोडला.तेव्हापासून त्याठिकाणच्या वसाहतीला मिरी हे नाव पडले. असे प्रसंग या जिल्ह्यात घडले. हे रामायण, स्कंदपुराण या ग्रंथावरून सिद्ध करता येते. 

महत्वाचा पौराणिक दाखला निधी निवास / नेवासे येथील मोहोनीराजाचे  देव दानवांचे समुद्रमंथन केल्यानंतर जी चौदा रत्ने बाहेर आली त्यातील अमृताचे वाटप हा प्रसंग नगर जिल्ह्यातच घडला. श्री विष्णूने मोहिनीचे रूप घेतले. राहू नावाचा राक्षस देवांच्या पंचायतीमध्ये बसून अमृत प्राशन करू लागला हे श्री विष्णूंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुदर्शन चक्राने त्याचे शीर कापले ते ठिकाण राहुरी आणि अमृत प्राशन करण्यासाठी देव पंचायत जेथे बसली होती ते ठिकाण म्हणजे देवळाली होय.                        

पांडवकाळातील काही ठिकाणेही याच जिल्ह्यात आहेत. बब्रूवाहन याची राजधानी. अर्जुन आणि बब्रूवाहन यांचे युद्ध याच रणांगणावर म्हणजे माका ता.पाथर्डी येथे आहे . अर्जुनाचा शोक व श्रीकृष्णाची शिष्टाइ हे प्रसंग पाथर्डी येथे घडले.आर्य समाजातील पहिली वसाहत अकोला येथे आहे. 

पर्दप दास पोहोचले ते नाथपंथियांचे  आदिपीठ नगर जिल्ह्यातील वृद्धेश्वर (म्हातारदेव) हे होय. नगरच्या गर्भगिरीच्या डोंगरात या नाथ संप्रदायाची कर्मभूमी आहे. नवनाथांपैकी मछिंद्र, गोरख, गहिनी,जालिंदर व कानिफ हे प्रमुख नाथ पांचायतन. त्यांचे आश्रम व समाध्या या गर्भगिरीच्या डोंगरावर आहे. गोरखनाथ हे मराठीचे पहिले ग्रंथ कार मानले जातात. त्यांचे हस्तलिखित असल्याचे सांगितले जाते. श्री ज्ञानेश्वर हे नाथपंथियांचे अनुयायी त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ हे गहिनीनाथांचे शिष्य त्यांनीच ज्ञानेश्वरांना गुरु उपदेश केला. या चार भावंडांचा खूप मोठा काळ याच जिल्ह्यात गेला. मराठी वांड्मयाचा मुकुटमणी "ज्ञानेश्वरी" हा ग्रंथ याच जिल्ह्यात नेवासे येथे लिहिला गेला. 

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी या जिल्ह्यात खूप संचार केला. चक्रधर स्वामींचे शिष्य महेंद्र भट, राज व्यास, केशवराव भावे, देवव्यास याच जिल्ह्यात राहणारे. त्यामुळे महानुभाव पंथाची जोपासना याच जिल्ह्यात झाली. जिल्ह्यात मुसलमान मुल्ला-मौलवी बरेच झाले. त्यामध्ये  शहा-शरीफ हे सर्वात श्रेष्ठ पुरुष होऊन गेले. मालोजीराजांना शहाजी,शरीफजी हि दोन मुले या अवलियाच्या कृपा प्रसादाने झाली. औरंगजेबाने त्याची नौबत बंद  केली. त्यामुळे त्याला स्वप्नात येऊन शाप दिला. औरंगजेबाचा मृत्यू नगर येथे झाला.बुर्हाण निझामशाह याच्या काळात शाह ताहीर हा अवलिया होता. शाह ताहीर यांनी काही चमत्कार दाखविल्यामुळे निजाम शिया पंथी झाले. शाह ताहीर याचे शिया पंथी तत्वज्ञानाचे विद्यालय कोठला येथे होते. 

प्राचीन काळापासून विद्येचे माहेरघर गणले गेलेले प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण. नगर जिल्ह्याच्या हद्दीवर बाहेर औरंगाबाद जिल्ह्यात असले तरी नगर जिल्ह्याशी पैठणचे खूप जवळचे नाते अहे. संत एकनाथ महाराज नगर वासियांना खूप जवळचे वाटतात पुणतांब्याचे चांगदेव महाराज आणि कवी सुर्यभट यांनी १७५० मध्ये रामकृष्ण काव्य नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला तो डावीकडून उजवीकडे वाचल्यास त्याचा कथासार्थ रामकथा होते. आणि तीच ओळ उजवीकडून डावीकडे वाचल्यास तिचा कथासार्थ कृष्णकथा असा होतो. म्हणजे रामायण व महाभारत या दोन्ही कथा काव्य रूपात संस्कृत मध्ये. त्याची मांडणी केली आहे.मुंगीचे विसोबा खेचर , पैठणचे जगन्मित्र नागा, राशीन येथील केशरीनाथ, मांडवगण चे जयराम स्वामी , देवदैठणचे निंबराज महाराज, श्रीगोंद्याचे शेख महोम्मद माहाराज , पिंपळनेरचे निळोबा राय, सांत चरित्रकार महिपती बुवा ताहाराबादकर, शिवचरित्रकार परमानंद महाराज सोनईकर, नगरचे बाळाजी बुवा, शिर्डीचे साईबाबा , उपासनी महाराज, अवतार मेहेरबाबा , सांत कवी दासगणु महाराज, तसेच शेजारी बीड जिल्ह्यातील पण नगर जिल्ह्याशी संपर्क असणारे भगवानबाबा , वामनभाऊ आणि सावरगावचे सिदाजीअप्पा अशी श्रेष्ठ संत,विद्वान,पंडित मंडळी नगर जिल्ह्यात होऊन गेली आहेत.               

 लेखक - नारायण यशवंत आव्हाड 

२१/२,कौस्तुभ कॉलनी,बालाजी चौक, बोल्हेगाव,अहमदनगर. 

मो.क्र : ९२७३८५८४५७ / ९८८१९६३६०३

    

Post a Comment

0 Comments