छिंदम याची याचिका फेटाळली

छिंदम याची याचिका फेटाळली 

वेब टीम औरंगाबाद : अहमदनगर महापालिकेचे  नगरसेवक श्रीपाद शंकर छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने नगर महापालिकेच्या शिफारशीवरून त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरविले खंडपीठाने कदम याने दाखल केलेल्या याचिका सहा जानेवारीला राज्यशासनाच्या कारवाईस योग्य ठरविण्यात आले आहे.

नगरपालिकेत उपमहापौर असलेला छिंदम यांनी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेचे अधिकारी अशोक बिडवे यांना शिवीगाळ करीत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते यासंबंधीचे संभाषण सर्वत्र व्हायरल झाले होते तोफखाना पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता द्यावी नगरपालिकेच्या वतीने विशेष सभा बोलावून २६  फेब्रुवारीला यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला संबंधित ठराव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला होता राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी नगरसेवक पद रद्द केले औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते नगरसेवक पद रद्द असे आदेश बेकायदा असून आपणास म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी दिली नसल्याचे त्यांनी म्हटले होते खंडपीठात सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी राष्ट्रपुरूषाची बदनामी करणारे कृत्य चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते हे समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य असून त्यांच्या म्हणण्याला कायदेशीर आधार नसल्याचे सांगितले खंडपीठाने शासनाचे आदेश कायम ठेवत छिंदम यांची याचिका फेटाळली. 

Post a Comment

0 Comments