आरोग्याचा मूलमंत्र : योगसाधना ,आरोग्य आहार

आरोग्याचा मूलमंत्र 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
शरणागत मुद्रा 


या नावात जरी मुद्रा हा शब्द असला तरी एक आसन  म्हणूनच आपण याचा विचार कारणार आहोत.सर्वश्रेष्ठ विश्वनियंत्रक शक्तीला शरीराने व मानाने पूर्णपणे लिन होऊन शरण जाणे,हि भावना या आसनाच्या मागे आहे. विश्वनियंत्रक शक्तीच्या चरणाशी शरण जाण्याची मानसिक भूमिका व त्याचबारोबर प्रत्यक्षात शरण जाण्याची निदर्शक अशी शारीरिक हालचाल या आसनात निर्देशित केलेली आहे. 

क्रिया: 

आसनस्थिती 

पूर्वस्थिती - पद्मासन स्थिती 

१. श्वास सोडा व हळू हळू श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्यावर नेऊन नमस्कार केल्याप्रमाणे एकमेकांना जोडा. 

२. श्वास सोडा व कमरेत खाली वाकून कपाळ जमिनीवर टेकवा हातात जोडलेल्या स्थितीत सरळ ठेऊन शरीरापासून जास्तीतजास्त लांबवर जमिनीवर टेकवा. 

आसनस्थिती ससोडतांना 

१ श्वास सोडा व श्वास घेत घेत कमरेत सरळ व्हा.दोन्ही हात व मन वर उचला. हात डोक्यावर ताणूनच ठेवा. 

२. श्वास सोडत सोडत दोन्ही हात बाजूने खाली आणून ज्ञानमुद्रेत ठेवा. 

आसनस्थिती :

योगमुद्रेप्रमाणेच याही आसनात पोटाची घडी होते.ती जास्तीत जास्त कशी होईल याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. हात योगमुद्रेत सांगितल्याप्रमाणे मागे बांधून ठेवण्याऐवजी, डोक्यावर उंच करून मग कमरेबरोबर पुढे वाकवलेतर पाठीचा कणा सरळ ताठ राहून पोटाची अधिक सपाट घडी व्हायला मदत होते. 

पद्मासनातील पाय, गुडघे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले ठेऊन पाठीचा कणा साराला ठेवा, कपाळही जास्तीत जास्त लांबवर टेकण्याचा प्रयत्न करा. हात सरळ पुढे ताणताना दंड कानाजवळ ठेवा. असं पूर्ण झाल्यावर श्वसन संथपणे चालू ठेवा. 

कालावधी : 

हे आसन कमीत कमी दीड मिनिट तरी ठेवले पाहिजे. म्हणजे याचे फायदे अनुभवायला मिळतील. अभ्यासाने याचा कालवडी तीन मिनिटे केला तरी चालेल. 

दक्षता : 

हृदयाचे विकार , रक्तदाबाचा त्रास असलेले व नुकतेच बाळंतपण झालेल्या स्त्रियांनी हे आसन करू नये. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------             

आरोग्य आहार (पौष्टिक लाडू)

डिंकाचे लाडू 

साहित्य :२ वाट्या डिंक,३ वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस, २ वाट्या खारकांची पूड , अर्धी वाटी खसखस,१ वाटी कणिक,२ वाट्या तूप,३ वाट्या गूळ किसून, १ वाटी पिठीसाखर. १ जायफळाची पूड, १ वाटी बदाम.  

कृती : डिंक जाडसर कुटावा,बदाम सोलून त्याचे बारीक काप करून घ्यावेत,खसखस गुलाबी रंगावर भाजून कुटून घ्यावी,कणिक तुपावर खमंग भाजून घ्यावी,किसलेले खोबरे भाजून हाताने कुस्करून घ्यावे,कढईत तूप गरम करून थोडा थोडा डिंक घालून फुलवून टाळून घ्यावा. 

एका परातीत टळेल तळलेला डिंक,खारीक पूड,बदामाचे काप,कुटलेली खसखस,जायफळ पूड,खोबरे सर्व एकत्र करून चांगले कालवावे. त्यात ३ वाटी किसलेला गूळ व १ वाटी पिठीसाखर मिसळावी. फारच कोरडे वाटत असेल तर २ चमचे साजूक तूप गरम करून घालावे व माध्यम आकाराचे लाडू वळावेत. 

टीप :

१. गूळ किसून घेण्यापेक्षा गुळाचा तूप व १ चमचा पाणी घालून पाक केला तरी चालतो.पण प्रकटले लाडू गरम गरम असतानाच वळावे लागतात. 

२. डिंक कच्चा न घेता तुपात फुलऊन घेतला कि दातांना चिकटत नाही व पचायला सोपा जातो.                          

 


Post a Comment

0 Comments