बोठेच्या अडचणीत वाढ ,स्टॅंडिंग वॉरंट जारी

 बोठेच्या अडचणीत वाढ ,स्टॅंडिंग वॉरंट जारी

वेब टीम नगर : रेखा जरे हत्याकांडातील नजरेआड असलेला मुख्य सूत्रधार  बाळ बोठे याच्याविरोधातील पोलिसांनी दाखल केलेला "स्टॅंडिंग वॉरंट"चा अर्ज  पारनेर न्यायालयाने जारी केला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी हा निर्णय दिल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. या वॉरंटमुळे आता बोठे याला राज्यात व देशात कुठेही पकडणे शक्य होणार आहे.त्यामुळे बोठे  याच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जाते.  

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात ३० नोव्हेंबरला रात्री हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. जरे यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड वरून व सागर भिंगारदिवेच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड वरून या प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे तपासात पुढे आले आहे. दि. १ डिसेंबरच्या सायंकाळ पासून बाळ बोठे हा नजरेआड झाला होता.बोठे याच्या शोधासाठी पोलीस महिन्याभरापासून पाच पोलीस पथके शोध घेत होती.बाळ बोठे याला पकडण्यासाठी सुमारे पंचेचाळीस ठिकाणी छापे घातले मात्र बोठे मिळून न आल्याने पोलिसांनी पारनेर न्यायालयात स्टँडिंग वॉरंट साठी गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी अर्ज केला होता. बोठे याने या अर्जाला आव्हान दिले. संकेत ठाणगे यांच्या माध्यमातून न्यायालयासमोर म्हणणे मांडले. ठाणगे यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या स्टॅंडिंग वॉरंटविरोधात काल युक्तिवाद केला. त्यावर आज निर्णय देत बोठे याच्याविरुद्ध न्यायालयाने स्टॅंडिंग वॉरंट जारी केलेे आहे. बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होईल असे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments