आरोग्याचा मूलमंत्र : योग साधना, आरोग्य आहार

आरोग्याचा मूलमंत्र 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योग साधना 


पद्मासन 

एकाग्रचित्त राहण्यासाठी केल्या जाणार्‍या आसनांमध्ये पद्मासन हे महत्त्वाचे आसन आहे. पद्म म्हणजे कमळ, म्हणून या आसनाला कमलासनही असेही म्हणतात.

 कृती : हे आसन बसून केले जाते. आधी पाय लांब करून बसा. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून डाव्या पायाला उजव्या पायाच्या जांघेवर ठेवा. नंतर उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवा. दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यांवर सरळ ठेवा. दोनही हाताचे अंगठ्याजवळील बोट अंगठ्यावर ठेवा. बाकी तिन्ही बोटे सरळ ठेवा. डोळे बंद करा. पाठ ताठ ठेवून बसा. पद्मासनाला सर्व दुर्भावनांचा विनाशक म्हटले जाते. पद्मासनाचे फायदे : 'इंद पद्मासन प्रोक्तंसर्वव्याधी विनाशनम्' -म्हणजेच पद्मासन सर्व व्याधींचा नाश करते. सर्व व्याधी म्हणजेच शारीरिक,दैविक आणि भौतिक व्याधी.

पद्मासन केल्याने साधक किंवा रोग्याचे चित्त शांत होण्यास मदत होते. साधना आणि ध्यान करण्यासाठी हे आसन उत्कृष्ट आहे. याने चित्त एकाग्रीत होते आणि एकाग्रचित्ताने धारणा सिद्ध करता येते.

पूर्वस्थिती -पद्मासनस्थिती 

१)श्वास घ्या व सोडून दोन्ही हातांचे तळवे पोटाजवळ नाभीच्या खाली दोन्ही पायांच्या टाचांवर ठेवा डाव्या हाताचा तळवा  खाली ठेवून त्यावर उजव्या हाताचा तळवा   ठेवा. हाताची बोटे एकमेकांना चिकटलेली ठेवा . 

२)श्वास सोडून कमरेत खाली वाका व कपाळ जमिनीवर टेकवा . वाकण्याची क्रिया पूर्ण झाल्यावर श्वसन संथपणे  चालू ठेवा श्वास रोखून ठेवू नका . 

आसन स्थिती सॊडणे 

१) श्वास सोडा व श्वास घेत घेत कमरेत सरळ व्हा आसन क्रमांक १ची स्थिती घ्या 

२)दोन्ही हात गुडघ्यावर टेकवून ज्ञानमुद्रा करा 

आसनस्थिती 

या आसनाची सर्व स्थिती केवळ हातांची अवस्था सोडल्यास मागील पहिल्या प्रकारासारखीच आहे . यात हात पोटाजवळ ठेवलेले  असल्याने खाली वाकताना हातांची कोपरे बरगड्यांना चिटकवून ऊर्ध्व दिशेला उभी ठेवा ,टी बाजूला पडू देऊ नका. 

घ्यावयाची काळजी : ज्यांचे पाय अती प्रमाणात दुखत असतील त्यांनी हे आसन करू नये. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 आरोग्य आहार 

मिक्स व्हेज सूप 

साहित्य : फरस बी ,गाजर ,सिमला मिरची ,टोमॅटो ,कोबी ,बीट, आलं ,लसून ,कांदा ,मिरेपूड ,जिरेपूड ,सैंधव 

कृती : सर्व भाज्या धुवून चिरून घ्याव्यात , कुकर मध्ये अगदी थोडे पाणी घेऊन सर्व भाज्या शिजवून घ्याव्यात . 

गार झाल्या नंतर एकसारख्या करून घ्याव्यात ,वाटल्यास गाळून घेणे . सूप तुम्हाला आवडेल इतके पातळ करून उकळावे . नंतर मिरेपूड ,जिरेपूड आणि सैंधव टाकावे. गरम गरम सर्व्ह करावे .

अनुपमा वैभव जोशी - 9404318875  (आहारतज्ञ्)

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak       


Post a Comment

0 Comments