दहशतवादी जकीउर रहमान पुन्हा तुरुंगात

दहशतवादी जकीउर रहमान पुन्हा तुरुंगात 

वेब टीम मुंबई : २६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी जकीउर रहमान लखवी याला पाकिस्तानात अटक झाली आहे. दहशतवाद्यांची मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर ही कारवाई करण्यात आली आहे. जकीउर रहमान लखवीने हाफीज सईदसोबत मिळून २६/११ च्या हल्ल्याचा कट रचला होता. ARY न्यूजच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर लखवीला मुंबई हल्ल्यानंतर २००८ मध्ये युएनएससीच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांद्वारे जागतीक दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आले होते. मुंबई हल्ल्याच्या तपासादरम्यान हे स्पष्ट झालं होतं की, लखवीनेच हाफीज सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना आखून दिली होती.

या हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या १० सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबई शहरात अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात १६६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. सुमारे ६ वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर एप्रिल २०१५ रोजी लष्करचा ऑपरेशन कमांडर लखवीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली होती

Post a Comment

0 Comments