मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना, आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
वीरभद्रासन -१   





दक्ष राजाने एका मोठ्या यजनाचे आयोजन केले . आपली मुलगी सती आणि तिचा पती महादेव यांना आमंत्रण दिले नाही, तरीही सती या यज्ञाला उपस्थित राहिली.  परंतु तिथे तिचा अपमान करण्यात आला त्यामुळे तिने अग्नीत उडी घेऊन प्राण दिले . शंकराला जेव्हा ही गोष्ट कळली तो अत्यंत प्रक्षुब्ध  झाला आणि त्याने आपल्या जटेतून एक केस उपटून जमिनीवर आपटला, त्यातून वीरभद्र नावाचा सामर्थ्य योद्धा निर्माण झाला.  शंकराच्या आज्ञेची प्रतीक्षा करत उभा राहिला . दक्षराजा  वर चालून जाणाऱ्या आपल्या सैन्याचे अधिपत्य स्वीकार आणि यज्ञाचा विध्वंस कर अशी त्याला शंकराने आज्ञा दिली.  त्याच्याकडे जमलेल्या लोकांना मध्ये वीरभद्र सैन्यासह वादळासारखा घुसला त्याने यज्ञाचा विध्वंस केला . इतर देवांना आणि पृथ्वी त्यांना पळवून लावले आणि दक्षाचा शिरच्छेद केला सतीच्या विरहामुळे दुःखी झालेला झालेल्या शिवाने कैलासगमन केले, आणि तपश्चर्या सुरू केली हिमालयांच्या पोटी  सती ही उमा म्हणून जन्माला आली तिने  शंकराची पुन्हा एकदा आराधना केली आणि त्याला प्रसन्न करून घेतले.  'कुमारसंभव' या महाकाव्यात  कालिदासाने   ही कथा सांगितली आहे.  आपल्या जटेतील केसातून  निर्माण केलेल्या सामर्थ्यवान वीराचे नाव या आसनाला दिले आहे.

 पद्धती: 

१) ताडासनात  उभे राहा दोन्ही हात डोक्यावर उंच करा ताणा आणि तळहात एकमेकांना जुळवा. 

२) दीर्घ श्वास घ्या आणि उडी मारून पावला मध्ये चार ते साडेचार फूट अंतर राहील अशा बेताने उभे रहा

३) श्वास बाहेर सोडा आणि उजवीकडे वळा एकाच वेळी उजवे पाऊल  90 अंशनी व डावे पाऊल  जरासे उजवीकडे वळवा उजवी मांडी जमिनीवर समांतर होईल आणि पायाची नडगी जमिनीशी काटकोनात राहील अशा बेताने उजवा गुडघा वाकवा  त्यामुळे उजवी मांडी व उजवी पोटरी एकमेकांशी काटकोन करतील वाकलेला गुडघा घोटा पेक्षा पुढे जाता कामा नये व तो टाचेच्या समांतर रेषेत असायला हवा.  

४)डावा पाय ताठ करा आणि गुडिघ्याशी घट्ट आवळून घ्या

५) चेहरा ,छाती आणि उजवा गुडघा  हे उजव्या पावलाच्या दिशेला असावयास हवे . डोके वर करा पाठीचा कणा  त्रिकास्थिपासून ताणून धरा  आणि जुळलेल्या तळहातावर दृष्टी खिळवा 

६) या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करत वीस सेकंद ते अर्धा मिनिट उभे राहा. 

८) पुन्हा ताडासनात या.

 विशेष सूचना : उभे राहण्याची सर्व आसने श्रमाची असतात हे असं तर विशेषतः मेहनतीचे आहे ज्यांचे हृदयस्थ असेल त्यांनी हे असं करण्याचा प्रयत्न करू नये सशक्त व्यक्तींनी सुद्धा या आसनात जास्त वेळ राहू नये. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
अळू वडी

साहित्य : अळूची मोठी मोठी पाने , दिड वाटी बेसन पीठ, १ चमचा तांदळाची पिठी , २ तुकडे चिंचेचा कोळ, गुळ , हळद,तिखट,मीठ , धने-जिरे पूड,तेल , आलं लसूण पेस्ट . 

कृती: 

अळूची पानाचे देठ काढून पाने स्वच्छ धून पुसून घ्यावीत. 

चिंचेच्या कोळात गुळ , मीठ, तिखट,हळद , आलं लसूण पेस्ट, धने जिरे पूड व त्यातच डाळीचे पीठ व १ चमचाभर तांदळाचे पीठ घालून सर्व चांगले एकत्रित करून घ्यावे . गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे.तयार मिश्रणात १ चमचा तेल घालावे. 

अळूच्या पानाची उलट बाजू वर घेऊन त्या पानावर कालवलेले डाळीचे पीठ पातळ पसरावे. पीठ फार घट्ट नसावे,पानाच्या कडे पर्यंत पसरावे. 

त्यावरच दुसरे अळूचे पान पसरावे व त्यावर पण पीठ लावावे. पानाच्या कडा आतल्या बाजूस दुमडाव्यात व पण वरून खाली निमुळत्या भागाकडे गुंडाळावे. पण गुंडाळत असताना त्यात मध्ये मध्ये पित्ताचे मिश्रण लावावे व पण घट्ट गुंडाळावे. 

एका चाळणीला तेलाचा हात लावून पानाच्या गुंडाळ्या त्यात ठेवाव्यात व सध्या कुकरमध्ये उकडून घ्याव्यात. 

गार झाल्यावर आवडीप्रमाणे पातळ व जाड कापून गुलाबी रंगावर टाळून घ्याव्यात.         

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments