वेदांत अमृततुल्य कढीवडा आजपासून नगरकरांच्या सेवेत

 वेदांत अमृततुल्य कढीवडा आजपासून नगरकरांच्या सेवेत 


वेब टीम नगर : स्वादिष्ट चवीच्या ग्राहकांच्या पसंतीच्या कढीवड्याचे भव्य दालन वेदांत अमृततुल्य कढीवडा आजपासून नगरकरांच्या सेवेत रुजू झाले विकास पटवेकर यांच्या दालनात नगरकरांच्या आवडता कढीवडा नगरकरांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 या दालनात स्वच्छतेला विशेष महत्व दिले असून तेथील सर्व पदार्थ हायजेनिक पद्धतीने केले जाणार आहेत.पदार्थ तयार करण्यापासून ते सर्व्ह करण्यापर्यंत सर्व ठिकाणी स्वच्छतेचे पालन करण्याकडे पटवेकर यांचा कटाक्ष असून खास प्रयोगाअंती इथल्या वड्याच्या मसाल्याची चव ठरविण्यात आली आहे.त्याचबरोबर घरगुती पद्धतीने तयार केलेल्या कढी सोबत हा वडा दिला जाणार असल्याने कढी आणि वाड्याची एकत्रितपणे येणारी चवही उत्तम आहे.शिवाय दहापेक्षा जास्त वड्यांची मागणी असल्यास कोठेही घरपोच सेवा उपलब्ध होणार आहे घरपोच सेवा विनामूल्य असणार आहे.  याबरोबरच मुगाच्या डाळीचे भजे, वडापाव आदी पदार्थही ग्राहकांच्या दिमतीला असणार आहेत. या दालनात सहकुटुंब बसण्याची सोय आहे. 

वेदांत अमृतुल्य कढीवडा या दालनात वस्ताद पटवेकर पद्धतीचा लेमन टी,जायकेदार चहा-कॉफी हि उपलब्ध आहे. 

ग्राहक एकदा येईल तर पुन्हा पुन्हा येईल अशी खात्री विकास पडळकर यांना असल्याने या व्यवसायात ते यशस्वी होतील अशी खात्री अनेक ग्राहकांनी पहिल्याच दिवशी व्यक्त केली विकास पटवेकर उदय पटवेकर विनोद पटवेकर यांनी ग्राहकांचे आज स्वागत केले.


Post a Comment

0 Comments