जिल्हा परिषदेत आराेग्य कर्मचार्याचा मृत्यू

 जिल्हा परिषदेत आराेग्य कर्मचार्याचा मृत्यू

वेब टीम नगर : जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्याचा काल  (बुधवारी) नगर जिल्हा परिषदेत मृत्यू झाला आहे. चाैधरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर चाैधरी यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट हाेणार आहे.

नीलेश आत्माराम चाैधरी (वय ३२) असे मृ्त्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या ते नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे आराेग्य सेवक म्हणून कार्यरत हाेते. कामानिमित्ताने ते नगरला आलेले हाेते. काल सायंकाळी सहाच्या सुमारास ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाच्या बाहेर असलेल्या स्वागत कक्षात बसलेले असतानाच त्यांना अचानक उलटी हाेण्यास सुरवात झाली. यानंतर येथील कर्मचार्यांनी तातडीने ही माहिती वरिष्ठांना देऊन त्यांना रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया केली. १०८ रुग्णवाहिकेला काॅल करून बाेलविण्यात आले. रुग्णवाहिका दाखल हाेताच त्यातील डाॅक्टरांनी चाैधरी यांची तपासणी करून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डाॅक्टरांनी तपासणी केली असता ते मृत असल्याचे घाेषीत करण्यात आले. चाैधरी यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मृत्यू नेमका कशाने झाला याला मात्र वैद्यकीय सूत्रांनी रात्री उशिरापर्यंता दुजाेरा देण्यात आलेला नाही.

दरम्यान चाैधरी हे कागदपत्रासंदर्भात जिल्हा परिषदेत येत हाेते. कागदपत्रे मिळावी, यासाठी त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चर्चाही केली हाेती. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी चाैधरी यांच्या कागदपत्रांची पूर्तता करावी, अशा सूचनाही आराेग्य विभागाला दिल्या हाेत्या. परंतु चाैधरी काल जिल्हा परिषदेत नेमके कशासाठी आले हाेते. याचा मात्र उलगडा हाेत नसल्याने त्याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहे.

Post a Comment

0 Comments