बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांना अटक

  बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांना अटक 

वेब टीम पारनेर : तालुक्यातील काताळवेढे येथे बैलगाडा शर्यतीचे  आयोजन  केल्याबद्दल १४ आयोजकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात अली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वीच बैलगाडा व तत्सम शर्यतींवर बंदि घातली असली तरीही काही शौकिनांनी डोंगर चढावर बैलगाडा  शर्यतीचे आयोजन केले होते. 

काताळवेढे येथे बैलगाडा शर्यत सुरु असल्याची तक्रार आल्यानंतर सपोनि. पी.टी वाघ हे  फौज फाट्यासह त्याठिकाणी पोहोचले सकाळी साडेनऊ च्या सुमारास तेथे शर्यत सुरु असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या शर्यतीमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याने या शर्यती तात्काळ थांबवण्यात आल्या . या शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना अटक करण्यात अली आहे. 


Post a Comment

0 Comments